नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११ कोटींच्या कर्जमाफीची शक्यता

The possibility of a loan waiver of Rs 311 crore
The possibility of a loan waiver of Rs 311 crore

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ५ लाख ४८ हजार १४८ कर्जखात्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकऱ्यांना आधार क्रमांक प्रमाणिकरणानंतर सुमारे ३ हजार ३११ कोटी ९८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकेल.

पथदर्शी योजनेंतर्गत या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन गावांतील एकूण १ हजार ३८० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. येत्या शुक्रवार (ता. २८) पर्यंत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ६३२ शेतकऱ्यांना सुमारे १ हजार ४६१ कोटी ३६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळू शकेल. १ लाख ९५ हजार ६६१ शेतकऱ्यांची माहिती बँकेने पोर्टलवर अपलोड केली आहे. सोनखेड (ता. लोहा) येथील २६१ शेतकरी आणि कामठा बु.(ता. अर्धापूर) येथील १६२ शेतकऱ्यांच्या यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. सोमवारी (ता. २४) कामठा बु. येथे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस, तहसीलदार सुजीत नरहरे, सहाय्यक निबंधक अमरसिंह चौहान यांच्या उपस्थितीत आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरण करण्यात आले.

ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र येथे याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास शहानिशा करून त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.    

परभणी जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ५९२ शेतकऱ्यांना १ हजार २७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपयांची कर्जमाफी मिळू शकेल. एकूण कर्जखात्यांपैकी २ लाख १४ हजार ६१५ शेतकऱ्यांची कर्जखाती आधारक्रमांशी संलग्न आहेत. तर, ८ हजार ९७७ शेतक-यांची खाती आधारसलंग्न नाहीत. एकूण १ लाख ९५ हजार ११३ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. पिंगळी (ता. परभणी) आणि गिरगाव (ता. सेलू) येथील एकूण ७२४ शेतकऱ्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची पावती दिली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात समगा येथील १४७ आणि खरबी या गावातील ८६ शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावती देण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार उपस्थित होते. १ लाख ०५ हजार ६९० कर्जखाती आधार सलंग्न केली आहेत. त्यापैकी ९६ हजार ९९५ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली. अजून ३ हजार ५०० शेतकऱ्यांची आधार जोडणी प्रलंबित आहेत. 

आधार क्रमांक प्रमाणिकरणानंतर कर्जमाफीची पावती

जिल्ह्यातील सर्व बँक स्तरावर आधार प्रमाणीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र, बँकांच्या शाखेमध्ये जाऊन आधार कार्ड, यादीमधील विशिष्ट क्रमांक, बचत खाते पुस्तक, मोबाईल क्रमांक आदी माहिती देणे आवश्यक आहे. आधार प्रमाणिकरणानंतर नोंद प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com