Agriculture news in marathi Possibility of loss of mung in Satpuda | Agrowon

सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

जळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस टिकून आहे. या भागात सततच्या पावसाने मूग पिकाचे नुकसान शक्य आहे.

जळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस टिकून आहे. या भागात सततच्या पावसाने मूग पिकाचे नुकसान शक्य आहे. भिज पाऊस सुरूच राहिला, तर अतिवृष्टी होवू शकते. यामुळे काढणीवर आलेल्या मुगाच्या शेगांमधील दाण्यांना कोंब फुटू शकतात, अशी स्थिती आहे. 

मुगाचे पीक सातपुडा पर्वत भागात नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, रावेर, यावल आदी भागात जोमात होते. तर सातमाळा भागात पाचोरा, चाळीसगाव, जामनेरकडेही मूग पीक जोमात होते. शेंगा जोमात लगडल्या. वाढही व्यवस्थित झाली. यंदा एकरी किमान तीन क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, काढणीच्या वेळेस पिकाची स्थिती नाजूक बनली आहे. 

गेले तीन दिवंस सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यात भिज पाऊस आहे. सूर्यदर्शन नाही. यामुळे मूग पिकाच्या शेगांचे नुकसान होवू शकते. दाणे काळे, पिवळे पडून त्यांचा दर्जा घसरू शकतो. या स्थितीत लहान शेतकरी किंवा कमी क्षेत्रात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी शेंगांची काढणी सुरू केली असून, काढणी करून शेंगा घरात साठविल्या जात आहेत. त्या घरात किंवा गोठ्यात पंख्याच्या कृत्रीम हवेत वाळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वातावरण प्रतिकूल असल्याने शेंगा पक्व होण्याचे किंवा वाळण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. काढणी रखडत असल्याने त्यावरील पुढील पेरणीदेखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

मुग काढणी कोलमडणार

अनेक शेतकऱ्यांनी मूग काढणी पोळा सणानंतर करण्याचे नियोजन केले होते. लागलीच त्यात मका, कांदेबाग केळी लागवडीची तयारी झाली होती. तर, काही शेतकरी कांदा लागवडीसाठीदेखील उत्सुक होते. परंतु, पावसामुळे हे नियोजन कोलमडणार असून, उत्पादन किमान २५ ते ३० टक्के कमी होवू शकते. तसेच पुढील पेरणीदेखील लांबणीवर पडेल. वाफसा वेळेत होणार नाही. यामुळे पेरणीपूर्व मशागतही करता येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...