agriculture news in Marathi possibility of Orange production up Maharashtra | Agrowon

संत्रा उत्पादन वाढीचा अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

या वर्षी आंबिया बहारात फळांचे उत्पादन साडेचार ते पाच लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. मृग बहार सध्या फूलधारणेवर आहे. पावसाच्या पाण्यावर याचे व्यवस्थापन होते. मॉन्सूनपूर्व पावसामुळे या बहाराला काहीसा फटका बसला. त्यामुळे उत्पादकता प्रभावित होईल, अशी परिस्थिती सध्या आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

अमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी आंबिया बहाराची उत्पादकता चांगली होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अमरावती, नागपूर जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या संत्र्यापासून सुमारे साडेचार ते पाच लाख टनांचे उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती महाऑरेंजच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

आंबिया बहाराचे व्यवस्थापन संरक्षित सिंचनाचे पर्याय असलेल्या शेतकऱ्यांद्वारे होते. सध्या आंबिया बहाराची फळे लिंबाच्या फळाच्या आकाराची आहेत. २० ऑगस्टपासून याची तोडणी सुरू होते. १ सप्टेंबरपासून याची फळे मिळतात. या हंगामातील फळाची चव थोडी आंबट राहते. 

या फळांना दक्षिणेत मागणी राहते. केरळ, चेन्नई, आंध प्रदेशमध्ये याचा पुरवठा होतो. त्यासोबतच बांगलादेशातही याचा पुरवठा केला जातो. या वर्षी वातावरण पोषक असल्याने साडेचार ते पाच लाख टन फळांच्या उत्पादनाचा अंदाज आहे. महाराष्ट्राची हेक्टरी सात ते दहा टन सरासरी उत्पादकता आहे. 
मृग बहार फूलधारणेवर आहे. हे पीक जून महिन्यापर्यंत ताणावर सोडले जाते. सरासरी १५ मे पासून ताणावर सोडले जाते. जमिनीचा मगदूर पाहून ताणावर सोडण्याचा कालावधी ठरविला जातो. हलकी, मध्यम व भारी जमीन असे वर्गीकरण होते.

मॉन्सूनपूर्व पावसामुळे ही प्रक्रिया डिस्टर्ब झाल्याने यावर्षी मृग बहारातील फळांची उत्पादकता प्रभावित होण्याची शक्यता आहे. मृग बहारातील फळे १५ जानेवारीपासून तोडणीसाठी येतात आणि १० एपिलपर्यंत याची फळे मिळतात. या बहारातील फळांची चव गोड राहते. परिणामी याला चांगला दर मिळतो, असे सांगण्यात आले.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिटॅमीन सीचा प्रभावी स्रोत असल्याने संत्र्याला मागणी वाढती आहे. परिणामी येत्या हंगामात दरात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचेही महाऑरेंजकडून सांगण्यात आले. 

संत्रा उत्पादकांची शिवार फेरी
आंबिया बहारात फळगळ खूप होते. त्याचे व्यवस्थापन अनुभवी शेतकऱ्याने कशा प्रकारे केले, हे इतरांना कळावे याकरिता महाऑरेंजने संत्रा उत्पादकांची शिवार फेरी संकल्पना मांडली आहे. त्याची सुरुवात काटोल येथील मनोज जवंजाळ यांच्या बांधावरून झाली. विनायक धोंगडी (अंबिकापूर), सुभाष दारोकर (आष्टी) यांच्या शेतावरही शिवारफेरी होणार आहे. महाऑरेंज आणि कृषी विभागाने या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...