agriculture news in Marathi possibility of privatization JNPT Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न? 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव जवाहरलाल नेहरु बंदर कंटेनर टर्मिनलचे (जेएनपीसीटी) खासगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडून सुरु आहे.

मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव जवाहरलाल नेहरु बंदर कंटेनर टर्मिनलचे (जेएनपीसीटी) खासगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडून सुरु आहे. येत्या काही दिवसांतच जेएनपीटीच्या बोर्ड मीटिंगमध्ये याबाबतचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता कामगार संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

खासगीकरणाच्या या प्रयत्नांमुळे जेएनपीटी बंदरात कार्यरत असलेल्या सुमारे १४०० कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. जेएनपीटी बंदराच्या खाजगीकरणास विरोध होऊ नये म्हणून कामगारांना चांगल्या पॅकेजचे आमिष दाखवून स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस स्कीम) राबवण्याचा विचारही जेएनपीटी व्यवस्थापनाचा सुरु असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. 

देशात सर्वाधिक कंटेनर वाहतूक ही जेएनपीटी बंदरातून होत असते. या बंदराच्या बाजूला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अन्य तीन खाजगी बंदरे विकसित करण्यात आली असून तिन्ही खासगी बंदरे नफ्यात चालू असताना जेएनपीटीच्या मालकीचे असलेले जवाहरलाल नेहरु बंदर कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी) हे बंदर मात्र तोट्यात चालत असल्याचे जेएनपीटी व्यवस्थापनाकडून नेहमीच वार्षिक ताळेबंदात दर्शविले जात आहे.

त्यामुळे जेएनपीटी बंदरातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कंटेनर हाताळणी यंत्रणा उभारल्यास बंदर नफ्यात येईल असे कामगारांचे व्यवस्थापनाला नेहमीच सांगणे होते. मात्र बंदराचे खासगीकरण डोळ्यासमोर ठेवून जेएनपीटी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. 

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) धर्तीवर जेएनपीटी बंदर कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने येत्या काही महिन्यांत यासंदर्भात निविदा काढली जाण्याची शक्यता कामगारांनी व्यक्त केली आहे. 

व्यवस्थापनाला प्रस्ताव नाही 
जेएनपीटी प्रशासनाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा सचिव जयंत ढवळे यांच्याकडे विचारणा केली असता अद्यापपर्यंत केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडून जेएनपीटीच्या खासगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव जेएनपीटी व्यवस्थापनाला प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. केंद्र सरकारकडून विविध सरकारी आस्थापनांचे खासगीकरण होत असल्याने कदाचित जेएनपीटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती असावी. मात्र व्यवस्थापनाकडून अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसल्याचे जयंत ढवळे यांनी सांगितले. भविष्यात जेएनपीटीच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेईल, हे मी सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...