राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता 

मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता.१४) कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
possibility of rain in state
possibility of rain in state

पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता.१४) कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यातही विजा, मेघगर्जेनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी पडल्या. मालवण येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे सकरला असून, पंजाबच्या अमृतसरपासून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. हा कमी दाबाचा पट्टा आणखी दक्षिणेकडे सरकणार आहे. अरबी समुद्रावरून बाष्प पुरवठा होणार असल्याने गुरूवारपर्यंत (ता.१६) मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता.१४) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘आरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  सोमवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये  पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) (स्त्रोतः हवामान विभाग) 

कोकण : डहाणू ३२, जव्हार ४४, पालघर ७०, वसई ३०, माथेरान ४३, श्रीवर्धन ४२, सुधागडपाली ३२, उरण ३२, रत्नागिरी ३०, संगमेश्वर ३०, दोडामार्ग ६७, कुडाळ ७५, मालवण ११०, सावंतवाडी ८७, वेंगुर्ला ५४. मध्य महाराष्ट्र : दौंड ४२, लोणावळा कृषी २१, महाबळेश्वर २०.  मराठवाडा : बीड १५, गेवराई १८, कंधार ५९.  विदर्भ : चंद्रपूर ३६, गोंडपिंपरी ६३, सावळी ३०, वर्धा ४०, मालेगाव ३८, मंगरूळपीर ३५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com