Agriculture news in Marathi Possibility of re-agitation in sugarcane belt from ‘FRP’ | Page 2 ||| Agrowon

‘एफआरपी’वरून ऊस पट्ट्यात पुन्हा आंदोलनाची शक्यता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

यंदाच्या हंगामात एक रकमेऐवजी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून हालचाली सुरू असल्याने यंदाचा ऊस हंगाम पुन्हा आंदोलनाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात एक रकमेऐवजी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून हालचाली सुरू असल्याने यंदाचा ऊस हंगाम पुन्हा आंदोलनाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘स्वाभिमानी’सह इतर सर्व शेतकरी संघटनांनी या संभाव्य निर्णयाला कडाडून विरोध करताना एफआरपी तुकड्याने मिळाल्यास शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून साखरेचे दर कमी आहेत. गेल्या महिन्याभराचा अपवाद वगळता दोन वर्षांमध्ये सातत्याने क्विंटलला ३१०० रुपये इतक्याच दराने साखरेची विक्री होत आहे. यामुळे साखर कारखानदारांकडे हजारो टन साखर विक्री अभावी शिल्लक आहे. केंद्र शासन किमान विक्री मूल्य ही वाढवत नसल्याने साखर कारखानदारीत नाराजी आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एक रकमी एफआरपी देणे परवडत नसल्याचे कारण सांगत अनेक साखर कारखानदारांनी वेगवेगळ्या पद्धतीने एफआरपी तुकड्यांमध्ये दिली जावी, अशी मागणी केली होती.

साखरेला दर नसल्याने शेतकऱ्यांना एकदम रक्कम देणे अशक्य असल्याचे कारण सांगत कारखानदारांनी छुप्या पद्धतीने एक रकमी एफआरपीला विरोध केला होता. केंद्र सरकारने निती आयोगाच्या माध्यमातून याबाबतच्या सूचना राज्याकडून मागवल्या होत्या. मात्र महाराष्ट्र शासनानेही ही या एक रकमी एफआरपीच्या कायद्यास विरोध केला नाही. ही बाब शेतकरी संघटनांना खटकली. अनेक शेतकरी संघटनांनी एक रकमी एफआरपीचे तुकडे करण्यास विरोध दर्शवत वेगळ्या पद्धतीने आंदोलनाची घोषणा केली आहे. 

यंदाचा हंगाम केवळ एक महिन्यावर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा वाद यंदाचा ऊस हंगाम वेळेत सुरू करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत तीन टप्प्यांतील एफआरपीला जोरात विरोध करायचा असा चंग संघटनांनी बांधल्याने आता हंगामाची सुरुवात आंदोलनाने होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे राज्य शासनाने ही या प्रश्नाबाबत अद्याप मौन बाळगले आहे. अजून कोणत्याच पातळीवरून यंदाची एफआरपी कशी देण्यात येणार याबाबतची घोषणा झालेली नाही. राज्यातील शेतकरी संघटनांनी मात्र या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केल्याने केंद्र सरकारच्या एफआरपी बाबतच्या संभाव्य धोरणाकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे.


इतर अॅग्रो विशेष
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीरमानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...