Agriculture news in marathi The possibility of seed scarcity due to soybean loss | Agrowon

सोयाबीन नुकसानामुळे बियाणे टंचाईची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अकोला  ः यंदाचा सोयाबीन हंगाम शेतकऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांत सर्वाधिक नुकसानकारक ठरला. जिल्ह्यात यंदा लागवड झालेल्या एक लाख ७३ हजार हेक्टरचे परतीच्या पावसाने पूर्णतः नुकसान केले. त्याची झळ शेतकऱ्यांसोबतच बियाणे कंपन्यांना झेलावी लागली. पर्यायाने शेतकऱ्यांना पुन्हा येत्या हंगामात बियाण्याच्या नव्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. ही बियाणे टंचाई दूर करण्यासाठी कृषी यंत्रणांनी आत्तापासून ‘घरचे सोयाबीन बियाणे पेरा’ अशी जनजागृती सुरू केली आहे.

अकोला  ः यंदाचा सोयाबीन हंगाम शेतकऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांत सर्वाधिक नुकसानकारक ठरला. जिल्ह्यात यंदा लागवड झालेल्या एक लाख ७३ हजार हेक्टरचे परतीच्या पावसाने पूर्णतः नुकसान केले. त्याची झळ शेतकऱ्यांसोबतच बियाणे कंपन्यांना झेलावी लागली. पर्यायाने शेतकऱ्यांना पुन्हा येत्या हंगामात बियाण्याच्या नव्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. ही बियाणे टंचाई दूर करण्यासाठी कृषी यंत्रणांनी आत्तापासून ‘घरचे सोयाबीन बियाणे पेरा’ अशी जनजागृती सुरू केली आहे.

जिल्ह्यात सुमारे पावणे दोन लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली होती. जिल्ह्यात सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सरासरी १० ते १५ क्विंटलपर्यंत गृहीत मानली जाते. या सरासरीनुसार यंदा लागवड झालेल्या १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रातून किमान २५ लाख क्विंटल सोयाबीन उत्पादन यायला हवे होते. परंतु पीक काढणीच्या काळातच पावसाने हजेरी दिल्याने संपूर्ण क्षेत्राला फटका बसला. त्यामुळे यंदा सरासरीसुद्धा गाठली गेली नाही. यामुळे अनेकांना लागवडीचा खर्चसुद्धा निघू शकलेला नसल्याची वस्तुस्थिती आहे. ऑक्टोबरमधील पावसापूर्वी ज्यांचे पीक काढून झाले, त्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे. 

जिल्ह्याचे प्रमुख पीक सोयाबीन असल्याने यावरच शेतकऱ्यांचे प्रामुख्याने अर्थकारण आहे. सोयाबीन हंगाम हातातून गेल्याने शेतकरी यंदा कमालीचा अडचणीत आलेला आहे. याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नसून बियाणे कंपन्यांनाही अडचण तयार झाली आहे. चांगल्या दर्जाचे सोयाबीन मिळवताना यंदा कमालीची ओढाताण होण्याची शक्यता आहे.

घरचे बियाणे वापरण्यासाठी जनजागृती 
सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्‍यकता नसते. तीन ते पाच वर्षांपर्यंत हे घरचे बियाणे वापरल्या जाऊ शकते. यंदा अशी परिस्थिती तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी आत्तापासून आगामी हंगामासाठी घरगुती बियाणे साठवून ठेवावे याची जनजागृती कृषी विभागाने हातात घेतली आहे. अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनात कृषी यंत्रणा जेथे-जेथे व्यासपीठ मिळेल तेथे आता घरचे सोयाबीन बियाणे पेरा असा सल्ला देत आहेत. याच महिन्यात अकोला दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते एका घडीपत्रिका विमोचन झाले. यात घरगुती बियाणे साठवण्यापासून आगामी पेरणीपर्यंत काय काळजी घ्यावी, याबाबत सल्ला दिला जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...