Agriculture news in marathi Possibility of sparse showers in Marathwada, Vidarbha | Agrowon

मराठवाडा, विदर्भात तुरळक सरींची शक्यता 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

विदर्भ व मराठवाडा परिसरात काही प्रमाणात चक्रीय स्थिती आहे. ही स्थिती फारशी अधिक सक्रिय नसली तरी पुढील काही दिवस मराठवाडा व विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे उकाडा वाढणार आहे.

पुणे : विदर्भ व मराठवाडा परिसरात काही प्रमाणात चक्रीय स्थिती आहे. ही स्थिती फारशी अधिक सक्रिय नसली तरी पुढील काही दिवस मराठवाडा व विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे उकाडा वाढणार आहे. आज (गुरुवार) संपूर्ण विदर्भात तर शनिवारपासून (ता. २४) मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पूर्वमोसमीच्या सरी पडतील. उद्यापासून (शुक्रवार) विदर्भात आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

विदर्भातील होत असलेल्या बदलत्या वातावरणामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल तापमान वेगाने कमीअधिक होत आहे. बुलडाणा येथे सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर येथे सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २१) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदविले गेले. मागील तीन ते चार दिवसांपासून कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे सर्वांत कमी १८.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. 

विदर्भ व परिसरात आणि मराठवाड्यात असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीचा प्रभाव अधिक नसला तरी ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटरच्या दरम्यान आहे. उत्तर कर्नाटकाच्या दक्षिण उत्तर भागादरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र कर्नाटकाच्या दिशेने सरकत असून, ते दक्षिण तमिळनाडू या परिसरात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती रूपांतर होण्याची शक्यता आहे. तसेच तमिळनाडूच्या परिसरात समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्रीय स्थिती सक्रिय होत आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, विदर्भात असलेले पूर्वमोसमी पावसाचे मळभ काहीसे दूर झाले आहे. 


इतर बातम्या
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर वाढणार पुणे : हिंद महासागराचा परिसर आणि अरबी समुद्राचा...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
कृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचा...सांगली ः जिल्ह्यात १५ मे नंतर लॉकडाउन संपल्यानंतर...
नगर जिल्हा बॅंकेकडून मुख्यमंत्री...नगर ः कोरोना संकटाच्या सामन्यासाठी मदत म्हणून नगर...
बुलडाण्यात शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल...बुलडाणा ः कोरोना संसर्गाची साखळी मोडून...
पारनेर बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री...नगर ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पारनेर कृषी...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...पुणे ः राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
समूह सहायक, कृषी सहायकांनी पोकराच्या...अकोला : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पात निवड...
`किमतीची शहानिशा करूनच रासायनिक खते...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी बॅगवरील किमतीची शहानिशा...
जळगावात वितरकांकडे कापूस बियाणे दाखल जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने...
साखर संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस...कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे...
कांदा बियाणे मळणीला खानदेशात आला वेगजळगाव ः खानदेशात कांदा बियाणे मळणी सुरू आहे. मळणी...
नांदेड जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यूनांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मागील काही...
एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक...सोलापूर : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच...
हळदीच्या मुल्यसाखळीचा अभ्यास करावा ः...हिंगोली ः ‘‘शेतकऱ्यांनी हळद पिकाच्या मुल्यसाखळीचा...
नाशिकमध्ये पूर्वमोसमी पावसाचा ४५९...नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात एप्रिल...