Agriculture news in marathi possibility of water shortage in 187 villages in Latur district | Page 2 ||| Agrowon

अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या जास्त पाणीपातळी खाली गेली नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात एप्रिलमध्ये १८७ गावांत टंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे; पण पाण्याचा अधिक उपसा केला गेला तर ही संख्या वाढणार आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे.
- डॉ. बी. एन. संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

 

लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत मोठे पाऊस न झाल्याने मोठ्या प्रमाणात टंचाईची भीती वाटत होती; पण परतीच्या तसेच अवेळी झालेल्या पावसामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला. नदी-नाल्यांना पाणी आले. टंचाईचे सावट काही अंशी दूर झाले. तरीदेखील जिल्ह्याची पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पाणीपातळीच्या तुलनेत ०.८८ मीटरने खाली गेली आहे. एप्रिलपासून जिल्ह्यात १८७ गावात टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. 

यासंदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील ७११ विहिरींचे निरीक्षण केले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सप्टेंबर व ऑक्‍टोबर या दोन महिन्यांत ७११ विहिरींचे निरीक्षण केले आहे. यातून जिल्ह्याची पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पाणीपातळीच्या तुलनेत यावर्षी ०.८८ मीटरने खोल गेली आहे. 

यात जळकोट तालुक्‍यात सर्वाधिक १.८८ मीटरने, तर सर्वांत कमी शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात ०.३३ मीटरने पाणी पातळी खोल गेली आहे. या यंत्रणेने जिल्ह्यात किती गावांत टंचाई जाणवू शकते याचाही अभ्यास केला आहे.  

एप्रिलपासून जिल्ह्यातील १८७ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे. यात उदगीर तालुक्‍यातील ८५, चाकूर तालुक्‍यातील ८०, तर देवणी तालुक्‍यातील २२ गावांचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
रत्नागिरीत वाऱ्यांसह ढगाळ वातावरण;...रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
पाणी शुद्धीकरणासाठी नॅनो...अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि...
ढगाळ हवामानामुळे फळबाग उत्पादक धास्तावलेपुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने...
परभणी : दोन हजारांवर शेतकऱ्यांना...परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप...
औरंगाबाद विभागात १६ कारखान्यांना गाळप...औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर...
बदलत्या हवामानामुळे पिकांवरील परिणामाचा...सोलापूर ः सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचा...
पुणे जिल्ह्यात कांदा रोपांच्या दरात वाढपुणे  ः वाढलेल्या कांदा दरामुळे पुणे...
मधुक्रांती प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभनाशिक  : मधमाशीपालन या विषयावरील ‘मधुक्रांती...
गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन करताना...पुणे  : गाय, म्हशीला कृत्रिम रेतन करताना...
कलम केलेल्या द्राक्ष बागेमध्ये करावयाची...द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध...
जामखेड पालिकेने बाजार समितीला ठोकले टाळेजामखेड, जि. नगर ः नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल बियाणे...सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ९१२...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्तपुणे  : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी...
इथेनॉलनिर्मिती, मिश्रणासाठी बनवले नवे...वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी...
परभणी जिल्ह्यात पणन महासंघातर्फे दोन...परभणी : ‘‘महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
पगारासाठी ‘आदिनाथ’च्या कामगारांचे आंदोलनकरमाळा, जि. सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ...