संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष हंगाम प्रभावित होऊ नये

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे राज्यातील द्राक्ष हंगामावर विपरीत परिणाम होऊ नये,अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष हंगाम प्रभावित होऊ नये Possible restrictions, due to lockdown The grape season should not be affected
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष हंगाम प्रभावित होऊ नये Possible restrictions, due to lockdown The grape season should not be affected

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे राज्यातील द्राक्ष हंगामावर विपरीत परिणाम होऊ नये. द्राक्ष विक्री आणि प्रक्रिया उद्योगाला संभाव्य निर्बंधातून सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 मागील वर्षी लॉकडाउनच्या कालावधीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होणार नाही यांची सर्वातोपरी काळजी घेऊन द्राक्षबागेतील व पॅक हाउसमधील काम करण्यात आले. त्याच प्रमाणेच बेदाणा प्रोसेसिंग, रॅकवर तसेच शीतगृहात कामकाज करणारे मजुरांनीही सर्व खबरदारी घेऊन काम केले आहे. त्यामुळे चालू द्राक्ष हंगामातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सर्व उपाययोजना करून काम केले जात आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयांमुळे द्राक्ष हंगाम अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी.

स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष निर्यातीसाठी अपेडाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच कोरोना पार्श्वभूमीवर योग्य दक्षता घेऊन काम सुरू आहे. त्यामुळे हंगामात अडचण येणार नाही. या बाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या आशयाचे पत्र संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लिहले आहे. 

मागील द्राक्ष हंगामात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पाठपुरावा केल्यानंतर वाहतूक यंत्रणेतील अडचणी सोडविल्या गेल्या. द्राक्ष काढणीसाठी मजुरांची ने-आण करावी लागत आहे. त्यामुळे  मजुरांची ने-आण करण्यास सूट देण्यात यावी. द्राक्ष व इतर शेतमाल बाजारपेठेत अथवा जेएनपीटी बंदरापर्यंत पोहोचविण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वाहतूक व्यवस्थेस परवानगी मिळावी.

राज्यातंर्गत तसेच आंतरराज्यीय वाहतूक करण्याकरिता परवानगी देण्यात यावी. त्या अनुषंगाने ताजी द्राक्षे वाहतूक करण्यासाठी नॅशनल परमीट लागू करावे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व त्याअनुषंगाने राज्याच्या सीमा रेषेवर असलेल्या वाहतूक व पोलिस यंत्रणेस सूचना द्यावी. संबंधित राज्यांच्या  मुख्यमंत्र्याना आपल्या स्तरावरून या बाबत सूचित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. देशातून कोरोनाच्या आधी वार्षिक २ लाख मेट्रिक टन द्राक्ष निर्यात होत असे. 

कोरोनामुळे मागील वर्षी त्यात ५० हजार मेट्रिक टनांनी घट झाली आहे. मागील द्राक्ष हंगामात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाउनच्या कालावधीत शासनाने ज्या पद्धतीने मदत केली त्याच धर्तीवर पुन्हा एकदा महाराष्ट्रात व संपूर्ण देशात लॉकडाउनची परिस्थिती उद्‌भवली तर चालू हंगामात उत्पादित झालेल्या द्राक्ष फळ पिकाच्या बाबतीत सर्व नियम व अटी शर्तीचे पालन करून व सर्व खबरदारीचे उपाय योजून कामकाज करण्याची परवानगी द्यावी, असेही पत्रात लिहले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com