Agriculture news in Marathi Post-monsoon rains again | Page 3 ||| Agrowon

मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत असताना मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडविली आहे. जिल्ह्यात सिन्नर, देवळा व चांदवड तालुक्यांतील अनेक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे.

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत असताना मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडविली आहे. जिल्ह्यात सिन्नर, देवळा व चांदवड तालुक्यांतील अनेक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. सिन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार कांद्याचे पीक मातीसह वाहून गेल्याने मोठा फटका बसला आहे.  

रविवारी (ता. १७) दुपारनंतर सिन्नर तालुक्यातील उत्तर भागात देशवंडी, जायगाव, सोनगिरी आदी गावांमध्ये जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. यावेळी देशवंडी येथील महादेव नगर, डोमाडे मळा व अन्य काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नुकत्याच लागवड केलेल्या खरीप लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पावसाचे पाणी शेतातून वाहिल्याने मातीसह लागवड केलेला कांदा रोपेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मालेगाव, कळवण, नाशिक, दिंडोरी, निफाड, चांदवड,  त्र्यंबकेश्वर देवळा देवळात मध्यम ते हलका पाऊस झाला.पावसामुळे जिल्ह्यात छाटणीपश्चात सध्या पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे.नाशिक तालुक्यातील द्राक्ष बागा जिरण्याची समस्या डोके वर काढत आहे. यासह डाऊनीच्या प्रादुर्भावाने अडचणी वाढत आहे. जोरदार पावसामुळे द्राक्ष, टोमॅटो पिकात पाणी साचले होते. यासह शेतकऱ्यांच्या टोमॅटो लागवडीमध्ये लागवडी बाधित होत आहेत. 

कसमादे भागात पूर्वहंगामी द्राक्ष काढणीस असल्याने शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे भीतीचे वातावरण आहे.  प्रामुख्याने जिल्ह्यातील मका, बाजरी, सोयाबीन ही पिके कापणीला आहेत. मात्र, पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिके सोंगणी करून ठेवली आहेत. अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

प्रमुख नुकसान असे 

  • लेट खरीप लागवडीचे नुकसान
  • पाणी साचल्याने कांदा रोपवाटिकांमध्ये नुकसान 
  • सिन्नर तालुक्यात वीज पडून बैल ठार

कांदा पिकाच्या झालेल्या या नुकसानीचे संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
- भारत दिघोळे,  अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...