Agriculture News in Marathi Post-monsoon rains Hit on 12 thousand hectares | Agrowon

मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार हेक्टरवर फटका 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, ज्वारी, हरभरा, भाजीपाल्यासह ११ हजार ९३९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. द्राक्ष बागांचे सर्वाधिक १० हजार ६३९ हेक्टरवरील नुकसान झाले.

सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, ज्वारी, हरभरा, भाजीपाल्यासह ११ हजार ९३९ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. द्राक्ष बागांचे सर्वाधिक १० हजार ६३९ हेक्टरवरील नुकसान झाले. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने आज राज्य शासनाकडे पाठवला आहे. शासनाने अद्यापही पंचनाम्याचे आदेश दिलेले नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत पंचनामे सुरू होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यातील काढणीला आलेली आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. बागांमध्ये पाणी साचले असून, मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज वेताळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली. 

जिल्ह्यातील ३८४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे २६ हजार ८४२ शेतकऱ्यांच्या १० हजार ६३९.४७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार दहा हजार ६३९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. द्राक्षबागांचे नुकसान प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेले नसले तरी सुमारे तेरा ते पंधरा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यात डाळिंबाचे ३४३ हेक्टर, मका ५६.६० हेक्टर, भाजीपाला १६८.१० हेक्टर, हरभरा १४६.२०, इतर पिके ५३ हेक्टर, मिरज तालुक्यात भाजीपाला ६५ हेक्टर, हरभरा १४.१० हेक्टर गहू ४ हेक्टर, वाळवा तालुक्यात भाजीपाला ३५.८० हेक्टर, हरभरा १३१.१० हेक्टर, गहू ६.२० हेक्टर, ज्वारी ३५४.७० हेक्टर, इतर पिके ५४.८० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक नुकसानीचा हा अहवाल राज्य शासनाकडे शनिवारी पाठविला आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडेही देण्यात आला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबतचे आदेश अद्यापही शासनाने दिलेले नाहीत. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामेही होणार आहेत. 

जिल्ह्यातील पिकांचे नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये) 
द्राक्ष १०.६३९ 
डाळिंबाचे ३४३ 
मका ५६.६० 
भाजीपाला १६९.१० 
हरभरा १४६.२० 
इतर पिके ५३ हेक्टर

 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...