Agriculture news in marathi; Post-monsoon rains hit livestock | Agrowon

मान्सूनोत्तर पावसाचा पशुपालकांना फटका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नाशिक  : जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेळ्या व मेंढ्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. या नुकसानीमुळे पशुपालक हतबल झाले आहेत.

नाशिक  : जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेळ्या व मेंढ्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. या नुकसानीमुळे पशुपालक हतबल झाले आहेत.

मान्सूनोत्तर पावसामुळे हवामानात होणारे बदल या मुळे अनेक संसर्गजन्य रोगांची साथ आली आहे. त्यात मेंढपाळांचे चराईसाठी होणारे स्थलांतर यामुळे शेळ्या व मेंढ्यांना प्रादुर्भाव वाढल्याने अशक्त होत आहेत. पावसामुळे शेळ्या मेंढ्यांना चरताना अडचणी येत आहेत. वातावरणात गारवा असल्याने गारठून मेंढ्या आजारी पडत आहेत. आजारी पडल्यानंतर कुठलाही इलाज करून मेंढ्यांना काहीही फरक पडत नसल्याचे लखमापूर येथील मेंढपाळ भागा कारभारी साळे यांनी सांगितले.

सततचा पाऊस असल्याने मालेगाव तालुक्यातील रावळगाव, सातमाने, सवंदगाव परिसरासह तसेच बागलाण तालुक्यातील लखमापूर शिवारातील जनावरे मोठ्या प्रमाणावर दगावत आहेत. त्यामुळे या परिसरातील मेंढपाळांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता. १) झालेल्या अवकाळी पावसामुळेदेखील ८५ गाय, म्हैस, बैल अशी जनावरे, तर ७०० हून अधिक शेळ्या मेंढ्या दगावल्या. तसेच येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर भागांतही मेंढ्या दगावण्याचे प्रमाण वाढले असून, आकडा १०० च्या जवळपास गेला आहे. उपजीविकेचे साधन मेंढी व शेळी पालन व्यवसाय असल्याने झालेल्या नुकसानीमुळे मोठे संकट मेंढपाळांवर ओढवले आहे.

याबाबतचे निवेदन बबन मोगरे, तुळशीराम कोरडकर, जिभाऊ कोरडकर, राजू कोरडकर, विवेक गायकवाड, अशोक फटांगडे, ज्ञानेश्वर फटांगडे, हरी ढेपले, सचिन बिडगर, भाऊसाहेब वडक्ते व इतर मेंढी व शेळी व्यावसायिकांनी दिले. याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त भागात संबंधित ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. या संदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी तहसीलदार चंद्रजित राजपूत व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत तातडीची बैठक घेऊन अवकाळी पावसामुळे दगावलेल्या मेंढ्यांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...