पोस्ट विभागाची पेमेंट बँक ठरतेय उपयुक्त

post payment bank
post payment bank

औरंगाबाद : ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी पैसे हवे असल्यास प्रदर्शनस्थळीच त्यांच्या बँकेच्या खात्यांत पैसे आहेत का हे तपासून खाते आधार सीडिंग किंवा लिंक केले असेल, तर तात्काळ पैसे मिळण्याची सोय इंडिया पोस्ट पेमेंट विभागाने केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरेदी सुकर झाली आहे. प्रदर्शनस्थळी हे एक आकर्षण ठरले आहे. अॅग्रोवनच्या या कृषी प्रदर्शनात पोस्ट विभागाने पोस्टाच्या विविध योजनांची माहिती व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सोय केली. ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या जनतेला भारतीय डाक जीवन विमा निगम, सुकन्या योजना, पोस्ट पेमेंट बँक व तिचे ऑनलाइन बँकिंग संबंधी माहिती दिली जाते आहे. ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न प्रदर्शनाला भेट देणारे अनेक लोक करताहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ईपीएसद्वारे पेमेंट काढण्याची सोय कृषी प्रदर्शनस्थळी करण्यात आली. तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल, त्या खात्यात पैसे असतील आणि त्याची आधारशी सीडिंग वा लिंक असेल तर दोन ते तीन मिनिटांत दहा हजारांपर्यंत रुपये काढून देण्याची सोय इथे करण्यात आली आहे.  याशिवाय नवीन आधार कार्डची नोंदणी, आधीच्या आधार कार्डमधील दुरुस्ती करण्याचे कामही पोस्ट विभागाच्या वतीने सुरू आहे. आधार दुरुस्ती आणि नवीन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कृषी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पेमेंट बँकेमध्ये जवळपास ३४ अकाउंट उघडण्यात आले, आठ ते दहा व्यक्तींनी एईपीएस या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या व्यवस्थेचा आधार घेऊन कृषी प्रदर्शनात आवश्यक खरेदीसाठी पैसेही काढले. इंडिया पोस्ट बँक व्यवस्थापक गजेंद्र जाधव म्हणाले, पहिल्या दिवशी तीन नवीन आधार कार्ड नोंदणी, तर जवळपास बारा आधार कार्डमधील दुरुस्तीसाठीचे काम करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com