नाशिक बाजार समितीच्या नोकर भरतीला स्थगिती

Postponement of recruitment of market committee employees
Postponement of recruitment of market committee employees

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिव यांनी सभेत गैरकामकाज व गैरपद्धतीने नोकरभरती केल्याने या झालेल्या नोकरभरतीला त्वरित स्थगिती मिळावी. या बाबत बाजार समिती संचालक रवींद्र भोये यांनी राज्याचे पणन मंत्री जयंत पाटील यांना पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत मंत्र्यांनी या नोकरभरतीला स्थगिती देत वस्तुस्थितीची चौकशी जिल्हा निबंधकांना आठ दिवसांत चौकशी करण्याबाबत असे आदेश दिले आहेत.

आपण स्वतः बाजार समितीच्या सेवक समितीवर असताना सभेची नोटीस नियमानुसार मुदतीत न देता पोस्टाने पाठविल्याचे संचालक भोये यांनी पत्रात म्हटले आहे. बाजार समितीच्या झालेल्या सभेत बेकायदेशीरपणे मनमानी करून व शासन नियमांचा भंग करून नोकरभरती संदर्भातील महेश वारुळे यांच्या नोकरी अर्जाचा विचारविनिमय करणे व ई-नाम योजनेअंतर्गत भरती करणे, या दोन्ही विषयांसंदर्भात बाजार समितीने कोणत्याही स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात न देता, सेवायोजन कार्यालयाकडून परवानगी व याद्या न मागवता सभेच्या दिवशी अर्ज देऊन नियुक्तिपत्र दिले. 

हा पणनच्या आदेशाचा भंग असून,या माध्यमातून नवीन कर्मचारी नेमून नोकरभरती घोटाळा करण्यात आलेला आहे. या भरती प्रक्रियेला स्थगितीची मागणी भोये यांनी या केली होती. त्यानुसार पणन मंत्री यांच्या सूचनेनुसार सहकार व पणन विभागाने कार्यवाही केल्याने सभापती शिवाजी चुंबळे यांना पुन्हा झटका बसला आहे.

पणन मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश नोकरभरतीला स्थगिती देण्याबाबत पत्र मिळाल्यानंतर पणनमंत्री जयंत पाटील यांनी नोकर भरतीस स्थगिती देत वस्तुस्थितीची आठ दिवसांत जिल्हा निबंधकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल शासनाकडे तत्काळ सादर करावा, असे पत्र राज्याचे उपसचिव का. गो. वळवी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना पाठविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com