Agriculture news in Marathi potato and flower rates Improvements in pune | Agrowon

गुलटेकडीत बटाटा, फ्लॉवर, शेवग्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असली तरी, बटाटा, फ्लॉवर, शेवगा, गाजर, बीट यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढले होते. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असली तरी, बटाटा, फ्लॉवर, शेवगा, गाजर, बीट यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढले होते. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा अवघा १ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून ६ ट्रक गाजर, हिमाचल आणि पंजाब येथून मटार सुमारे २२ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १२०० पोती, टॉमेटो सुमारे पाच हजार क्रेट, काकडी आणि भेंडी प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, गवार ८ टेम्पो, फ्लॉवर कोबी प्रत्येकी १० टेम्पो, भुईमूग सुमारे ५० पोती, ढोबळी मिरची १० टेम्पो, पावटा १० टेम्पो, घेवडा ५ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, जुना आणि नवीन कांदा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवीन ८००-१२००, जुना : ९०० ते ११००, तुर्कस्थान ७५०-८००,  बटाटा : २००-२४०, लसूण : १०००-१७००, आले : सातारी १००-५००, भेंडी : २५०-३००, गवार : ४००-५००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : १५०-२००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : २००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ८०-१२०, वांगी : १००-२५०, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : १३०-१४०, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : २५००, गाजर : ३००-३५०, वालवर : २००-२५०, बीट : २८०-३००, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार : परराज्य २८०-३००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १५) कोथिंबिरीची सुमारे ३ लाख, तर मेथीची सुमारे २ लाख जुड्यांची आवक झाली होती. 

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००-४००, मेथी : ३००-५००, शेपू : १३००, कांदापात : १००० -१५००, चाकवत : ८००-१०००, करडई : ८००-१०००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००- १५००, राजगिरा : ७००-८००, चुका : ८००-१०००, चवळई : ७००-८००, पालक : ५००-७००, हरभरा गड्डी -५००-१०००

फुले 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : २०-६०, कापरी : १०-२०, शेवंती : ४०-८०, अ‍ॅस्टर : ६-१०, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : १००-१५०, लिली बंडल : १२-१६, जरबेरा : ३०-६०, कार्नेशियन - १२०-२००.

फळबाजार
रविवारी (ता. १५) फळ बाजारात मोसंबी सुमारे ४० टन, संत्री ५ टन, डाळिंब सुमारे ३०० टन, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज १० टेम्पो, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे ७ हजार गोणी, पेरू ६०० क्रेटस, चिकू १ हजार डाग, विविध जातींची बोरे सुमारे २ हजार ५०० गोणी, तर सीताफळाची ५ टन, तर विविध द्राक्षांची सुमारे ३ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१२०, मोसंबी : नवा बहर (३ डझन) : १००-२५०, (४ डझन ) : ५०-१२०, जुना बहर (३ डझन) - ५००-९००, (डझन) - १८०-४००, संत्रा : (३ डझन) : २२०- ४५०, (४ डझन) : १००-१८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश : ५-२०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-२०, खरबूज : १०-२५, पपई : ५-१५, चिकू : ४००-६००, सीताफळ : २०-१२५, बोरे (१० किलो) : चेकनट : ४००-४५०, उमराण : ६०-८००, चमेली : ८०-१२०, चण्यामण्या : ३५०-४००.

मासळी बाजार
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १५) खोल समुद्रातील मासळी सुमारे ५ टन, खाडीची १५० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे ३०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ६ टन आवक झाली होती. दरम्यान मार्गशीर्ष महिना आणि रविवारची (ता. १५) संकष्टी चतुर्थीमुळे मासळीची मागणी घटली होती. मात्र आवक देखील कमी असल्याने मासळीचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. असे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. तर चिकन, अंड्याला आणि  मटणाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : ८००-९००, लहान ६००, भिला : ४५०-४८०, हलवा : ४८०, सुरमई : ४८०, रावस : लहान ५५०, मोठा : ७५०, घोळ : ५५०, भिंग : ३००, करली : २४०-२८०, करंदी : ३६०-४००, पाला : लहान ७५०-८००, मोठे : ११००-१२००, वाम : लहान पिवळी ४८०, मोठी ७००, काळी : ४००, ओले बोंबील : १२०.

कोळंबी 
लहान २८०, मोठे : ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १३००, मोरी : लहान : २४०-२८०, मोठे : ३६०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा :१६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या :  ५५०.

खाडीची मासळी
सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान २४०, मोठे ६५०, तांबोशी : ४४०, पालू : २४०, लेपा : लहान १४०, मोठे २४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान १६०, मोठे २४० पेडवी : १००, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १४०

नदीची मासळी
रहू : १४०, कतला : १४०, मरळ : ३६०, शिवडा : २००, चिलापी : १४०, खवली : २००, आम्ळी : १४०, खेकडे : २०० वाम : ५५०.

मटण
बोकडाचे : ५६०, बोल्हाईचे : ५६०, खिमा : ५६०, कलेजी : ६२०.

चिकन
चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.

अंडी 
गावरान : शेकडा : ८३० डझन : ११० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ४७५ डझन : ७२ प्रतिनग : ६
 

ताज्या बाजारभावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...