बटाटा लागवड ठरली फायदेशीर Potato cultivation proved to be beneficial
बटाटा लागवड ठरली फायदेशीर Potato cultivation proved to be beneficial

बटाटा लागवड ठरली फायदेशीर

आंबेगाव तालुक्‍यात बटाटा पिकाच्या काढणीत शेतकरी वर्ग मग्न आहे. बटाट्याला प्रतवारीनुसार ३० ते ३५ रुपये प्रति किलोला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक, साकोरे, महाळुंगे पडवळ, चास आदी गावांत तीन महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या बटाटा पिकाच्या काढणीत शेतकरी वर्ग मग्न आहे. बटाट्याला प्रतवारीनुसार ३० ते ३५ रुपये प्रति किलोला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  शेतकऱ्यांनी या वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यात बटाटा पिकाची लागवड केली होती. बियाण्याचे बाजारभाव जवळपास आठ ते नऊ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. बदलत्या नैसर्गिक परिस्थिती अनेक अडचणींवर मात करून शेतकऱ्यांनी बटाटा पिकाचे व्यवस्थापन केले. सध्या बटाटा पिकाच्या काढणीस शेतकरी मग्न आहेत.   लौकी येथील शेतकरी नितीन थोरात म्हणाले, ‘‘साडेचार हजार रुपये क्विंटल या बाजारभावाने २४ कट्टे बटाटा बियाणे खरेदी केले. सप्टेंबर महिन्यात दीड एकर क्षेत्रात लागवड केली. औषधे, खते, बियाणे, मजुरी असा एकरी एक लाख रुपये खर्च आला. २९ नोव्हेंबरला बटाटा पिकाची काढणी केली. तब्बल २४० पोती (दहा पट) उत्पादन निघाले आहे. अर्धा ते एक किलो वजनाचे बटाटे आहेत. व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन ३३ ते ३४ रुपये किलो बाजारभावाने खरेदी केली. खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.’’

प्रतिक्रिया

बटाटा बियाण्याचे दर या वर्षी वाढले होते. अवकाळी पावसाचाही अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे कमी क्षेत्रात बटाटा पिकाची लागवड झाली. उत्पादन व मागणी यामध्ये तफावत निर्माण झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. नजीकच्या काळात अजून बाजारभाव वाढतील.  - अजय विश्‍वासराव, व्यापारी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com