पुण्यात शेवगा, बटाटा, घेवड्याची आवक कमी; दरात वाढ

potato, drumstick Incoming decrease and rate hike in pune
potato, drumstick Incoming decrease and rate hike in pune

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असून, शेवगा, बटाटा आणि घेवड्याची आवक मंदावल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे, तर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा अवघा सुमारे ४०० किलो, कर्नाटक येथून घेवडा ५ टेम्पो, राजस्थानातून ७ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ४ ट्रक, गुजरात येथून भुईमूग सुमारे २ टेम्पो, मध्य प्रदेशातून मटार सुमारे २५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १२०० पोती, टोमॅटो सुमारे ६ हजार क्रेट, कोबी, फ्लॉवर आणि भेंडी प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, गवार ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा सुमारे १० टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ६००-८००, बटाटा : १८०-२६०, लसूण : १०००-१६००, आले : सातारी ३००-५००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान ३००-४००, सुरती ३००-५००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : २००-२२०, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : २००-२२०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ७०-८०, वांगी : १००-१५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००, जाड : १२०-१४०, शेवगा : २८००, गाजर : २००-२५०, वालवर : २००-२२०, बीट : २००-२२०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : वाळलेली ६००-६५०, मटार : परराज्य ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या  पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. २२) कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, मेथीची सुमारे २ लाख तर हरभरा गड्डाची सुमारे ५० हजार जुड्यांची आवक झाली होती.  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-५००, मेथी : ३००-५००, शेपू : ५००-७००, कांदापात : १२०० -१८००, चाकवत : ७००-८००, करडई : ६००-८००, पुदिना : १००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००- १५००, राजगिरा : ५००-७००, चुका : ६००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ५००-७००. हरभरा गड्डी -५००-८००० 

फळ बाजारात रविवारी (ता. २२) मोसंबी सुमारे २० टन, संत्री २ टन, डाळिंब सुमारे ३०० टन, कलिंगड २० टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे ८ हजार गोणी, पेरू दीड हजार क्रेटस, चिकू २ हजार डाग, विविध जातींची बोरे सुमारे ३ हजार ५०० गोणी, तर सीताफळाची ७ टन तर विविध द्राक्षांची सुमारे ३ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ६०-१००, मोसंबी : (३ डझन) : १००-२५०, (४ डझन) : ४०-११०, संत्रा : (३ डझन) : २००- ३५०, (४ डझन ) : ८०-२००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : १०-६०, गणेश : ५-३०, आरक्ता ५-४०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : ३-१५, चिकू : १००-४००, सीताफळ : २०-१५०, बोरे (१० किलो) : चेकनट : ४००-४५०, उमराण : ५०-७०, चमेली : ८०-११०, चण्यामण्या : ३००-४००. 

फुले  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : २०-६०, कापरी : २०-३०, शेवंती : ५०-१००, अ‍ॅस्टर : ८-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : २०-३०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : १०-१५, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन - ५०-१००. 

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी  (ता. २२) खोल समुद्रातील मासळी सुमारे ८ टन, खाडीची २०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे ५००किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार संपल्यानंतर मासळीची मागणी वाढली होती. परिणामी विविध मासळीच्या दरांत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती, असे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)  पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : ८००-९००, लहान ७००, भिला : ५५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : लहान ५५०, मोठा : ७५०-८००, घोळ : ६००, भिंग : ३२०, करली : २४०-३२०, करंदी : सोललेली ३६०-४००, पाला : लहान ७००-१२००, वाम : लहान पिवळी ४८०, मोठी ७००, काळी : ४००, ओले बोंबील : १२०-१८०. 

कोळंबी  लहान ३२०, मोठे : ४४००-४८०, जंबो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : २४०-४००, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १८०-२२०, खेकडे : २००, चिंबोऱ्या ४८०- ५५०. 

खाडीची मासळी  सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान  २४०, मोठे ७००, तांबोशी : ४४०-४८०, पालू : २४०, लेपा : लहान १२०, मोठे २४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान १००- १४० , मोठे २००-२८०, पेडवी : १००, बेळुंजी : १२०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १६०, तारली : १६० 

नदीची मासळी  रहू : १४०-१६०,  कतला : १६०-१८०, मरळ : ३६०-४००, शिवडा : २४०, खवली : २८०, आम्ळी : १००-१२०,  खेकडे : २०० वाम : ४८०-६००. 

मटण  बोकडाचे : ५६०, बोल्हाईचे : ५६०, खिमा : ५६०, कलेजी : ६२०. 

चिकन  चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 

अंडी  गावरान : शेकडा : ८३० डझन : १२०  प्रतिनग : १०, 

इंग्लिश : शेकडा : ४६५ डझन : ६६  प्रतिनग : ५.५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com