agriculture news in marathi, potato plantation starts, pune, maharashtra | Agrowon

आंबेगाव तालुक्यात बटाटा लागवड सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

महाळुंगे पडवळ, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी गावांमध्ये रब्बी हंगामातील बटाटा लागवडीच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बटाटा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी बटाटा बियाण्याचे बाजारभाव १५ ते २० टक्क्‍यांनी वाढले आहेत. 

महाळुंगे पडवळ, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी गावांमध्ये रब्बी हंगामातील बटाटा लागवडीच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बटाटा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी बटाटा बियाण्याचे बाजारभाव १५ ते २० टक्क्‍यांनी वाढले आहेत. 

या वर्षी पुरेसा पाऊस झाल्याने कळंब, चांडोली बुद्रुक, महाळुंगे पडवळ, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, थोरांदळे, भराडी, नागापूर, जाधववाडी, रांजणी आदी ४० गावांत बटाटा लागवड केली जात आहे. नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून बटाटा पीक आहे. या वर्षी बटाटा बियाण्याचे दर दोन हजार रुपये ते २५०० रुपये क्विंटल आहेत. कीटकनाशके, खते, बियाणे, मजुरी असा एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च बटाटा पिकासाठी येत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जवळपास २५० एकर क्षेत्रात रब्बी हंगामात बटाटा पिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाचा वापर बटाटा लागवडीसाठी करीत आहे. ८०० रुपये तास याप्रमाणे ट्रॅक्‍टरद्वारे लागवडीचा दर आहे. यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे वेळ, खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. कृषी विभागाने इतर अवजारांप्रमाणे बटाटा लागवड यंत्रही अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी प्रशांत सैद पाटील यांनी केली. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...