बटाट्याच्या दरात २५ टक्के सुधारणा

बटाट्याच्या दरात २५ टक्के सुधारणा
बटाट्याच्या दरात २५ टक्के सुधारणा

कोलकाता : गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाट्याच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. शहरातील महत्त्वाच्या बाजारातसुद्धा घाऊन किमतीतही वाढ झाली. गेल्या आठवड्यात १४ ते १५ रुपये असलेला दर १८ ते २० रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे.  पश्‍चिम बंगाल शीतगृह संघटनेचे अध्यक्ष पतीत पबन यांनी ही माहिती दिली. श्री. पबन म्हणाले, ‘‘आतापर्यंत बाजारात होणारी बटाट्याची अावक ही शेतकऱ्यांच्या गोदामातील होती. आता शीतगृहातून बाजारात बटाट्याची आवक सुरू होणार असल्याने दरात वाढ झाली आहे.’’ नजीकच्या ओडिशासह इतर राज्यांत बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे. शीतगृहातून बाजारात येणाऱ्या बटाट्याच्या दरात प्रति किलो ४ ते ५ रुपये वाढ झाली आहे. यात शीतगृहातील खर्च अंतर्भूत असल्याने ही वाढ झाल्याचे श्री. पबन यांनी सांगितले. पंचायत निवडणुका १४ मे रोजी होत असल्याने शीतगृहातील कामकाजासाठी मजुरांचा तुटवडा भासू लागला अाहे. दर वाढण्यात मजूरटंचाईचाही काही बाजारात परिणाम झाला आहे.  संघटनेचे माजी अध्यक्ष रामापाडा पाॅल म्हणाले, की मजूरटंचाईमुळे शीतगृहातून सध्या तत्कालिक गरज भागविण्यापुरतेच बटाट्याचा पुरवठा होत आहे. निवडणूक झाल्याशिवाय मजूर येणार नसल्याने बटाटा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत.  पोस्टा घाऊक बाजारातील कृषी सल्लागार सिबू मालाकर म्हणाले, की जोपर्यंत पुरवठ्यात मोठा खंड अाणि इतर राज्यांतून मागणीत वाढ होत नाही, तोपर्यंत लक्ष्मी बटाटा वाणास २० रुपये प्रति किलो दरम्यान राहील. दरातील बदल हा पश्‍चिम बंगालमध्ये बटाट्याचे उत्पादन कमी झाले म्हणून नाही, तर इतर राज्यांतील पीक नुकसानीत गेले म्हणून आहे. यंदा पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के कमी उत्पादन झाले असले, तरी १०० लाख टन उत्पादन अाहे. गेल्या वर्षी येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यास दराअभावी मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले होते.  आमचा विभागाचे बटाट्याच्या सद्यःस्थितीवर लक्ष आहे. कोणत्या प्रकारची साठेबाजी आणि दरात मोठी वाढ झाल्यास योग्य ती पावले उचलली जातील. मात्र बटाटा उत्पादक शेतकरी नुकसानीत जाणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.  - तपन दासगुप्ता, राज्य कृषी पणनमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com