Agriculture news in Marathi, Potato Rates 500 to 1800 rupees per quintal in State | Agrowon

राज्यात बटाटा प्रतिक्विंटल ५०० ते १८०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 जून 2019

पुण्यात प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) बटाट्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ९० ते १५० रुपये दर होता. बटाट्याची प्रामुख्याने आवक ही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून होत आहे. आज झालेल्या आवकेत उत्तर प्रदेशमधून सुमारे ५० तर मध्य प्रदेशातून २० ट्रकचा समावेश आहे. स्थानिक (तळेगाव) आवकेला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत प्रारंभ होईल, अशी माहिती ज्येष्ठ अडतदार राजेंद्र कोरपे यांनी दिली.

पुण्यात प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) बटाट्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ९० ते १५० रुपये दर होता. बटाट्याची प्रामुख्याने आवक ही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून होत आहे. आज झालेल्या आवकेत उत्तर प्रदेशमधून सुमारे ५० तर मध्य प्रदेशातून २० ट्रकचा समावेश आहे. स्थानिक (तळेगाव) आवकेला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत प्रारंभ होईल, अशी माहिती ज्येष्ठ अडतदार राजेंद्र कोरपे यांनी दिली.

अकोल्यात प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपये
अकोला ः येथील बाजारपेठेत बटाट्याची दररोज २५० ते ३०० टनांची आवक होत असून प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपयांदरम्यान विक्री होत आहे. किरकोळ बाजारात बटाटा १५ ते २० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.  अकोला बाजारपेठेत येणारा संपूर्ण बटाटा हा उत्तर प्रदेशातून येत असतो. दिवसाला १५ ते २० गाड्यांची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बटाटाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून स्थिरता आलेली आहे. दुय्यम दर्जाचा बटाटा सरासरी ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विकत आहे. तर चांगल्या दर्जाचा बटाटा सर्रास १००० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. येत्या काळात बटाट्याच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता तूर्त तरी नसल्याचा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त करण्यात आला आहे.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ८०० ते ११५० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) बटाट्याची ८०० क्‍विंटल आवक झाली. या बटाट्याला ८०० ते ११५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १७ जूनला बटाट्याची ६०० क्‍विंटल आवक झाली. या बटाट्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १९ जूनला ७०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ९०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० जूनला बटाट्याची आवक ९९९ क्‍विंटल, तर दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २२ जूनला ७०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याला ९०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २३ जूनला बटाट्याची आवक ७९९ क्‍विंटल झाली. या बटाट्याला ९०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

जळगावात प्रतिक्विंटल ४५० ते १२२५ रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक महिनाभरापासून स्थिर आहे. गुरुवारी (ता. २७) २८० क्विंटल आवक झाली. आवक मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून होत आहे. दर प्रतिक्विंटल ४५० ते १२२५ रुपये, असा होता. दरही स्थिर असल्याची माहिती मिळाली. किमान दरात मागील पंधरवड्यात काहीशी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

सोलापुरात प्रतिक्विंटल १८०० रुपयांवर
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात बटाट्याला तुलनेने कमीच उठाव राहिला. पण किरकोळ चढ-उतार वगळता त्याचे दरही काहीसे स्थिर राहिले. बटाट्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १८०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात बटाट्याची आवक रोज ५०० ते ८०० क्विंटलपर्यंत राहिली. मागणीच्या प्रमाणात ही आवक होती. पण फारसा उठाव नसल्याने दर टिकून राहिले. बटाट्याची सर्व आवक सातारा, पुणे भागातून झाली. बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हाच दर किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये होता. तर आवक रोज किमान ४०० ते ५०० क्विंटल होती. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात हीच आवक ५०० ते ८०० क्विंटलपर्यंत वाढली. तेव्हाही त्याचा दर जैसे थे राहिला. त्यावेळीही बटाट्याला प्रतिक्विंटलला किमान ४५० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपये दर मिळाला. गेल्या दोन-तीन सप्ताहापासून किरकोळ चढ-उतार वगळता बटाट्याचे दर स्थिर राहिल्याचे दिसून येते.

सांगलीत प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये
सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळे दुय्यम बाजार आवारात बटाट्याची आवक कमी अधिक आहे. गुरुवारी (ता. २७) बटाट्याची ३४९ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० तर सरासरी ११५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवारात सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातून आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यातून आवक होते. गुरुवारी (ता. २०) बटाट्याची १२८० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १००० ते १३०० तर सरासरी ११५० रुपये असा दर होता.  शुक्रवारी (ता. २१) बटाट्याची ८२५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १००० ते १३०० तर सरासरी ११५० रुपये असा दर मिळाला. शनिवारी (ता. २२) बटाट्याची १०२७  क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल १००० ते १३०० तर सरासरी ११५० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. २४) बटाट्याची ७२० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १२०० तर सरासरी १००० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २५) बटाट्याची ७१० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १२०० तर सरासरी ११५० रुपये असा दर मिळाला. बुधवारी (ता. २६) बटाट्याची १४९५ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० तर सरासरी ११५० रुपये असा दर होता. बटाट्याची आवक कमी अधिक होत असल्याने बटाट्याचे दर स्थिर आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १२६० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २६) बटाट्याची आवक १३३५ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२६० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २५) बटाट्याची आवक ८२३ क्विंटल झाली. त्यास ५५० ते १२०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० रुपये होता. सोमवारी (दि. २४) बटाट्याची आवक १९१५ क्विंटल झाली. त्यास ५५० ते १२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० मिळाला. शनिवारी (ता. २२) बटाट्याची आवक १६७९ क्विंटल झाली. त्यास ५५० ते १२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० होते. शुक्रवारी (ता. २१) बटाट्याची आवक १७३० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० होते. गुरुवारी (ता. २०) बटाट्याची आवक १५४५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत बटाट्याची आवक चांगली होती. गेल्या चार दिवसांत आवकेनुसार दर सर्वसाधारण आहेत.

नागपुरात प्रतिक्‍विंटल ९०० ते १२०० रुपये 
नागपूर ः कळमणा बाजार समितीत बटाट्याची आवक वाढती असल्याने दर गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. महिन्याच्या सुरवातीला बटाट्याचे दर ८०० ते १२०० रुपये क्‍विंटल होते. त्यानंतर १५ जूनला हे दर ९०० ते १३०० रुपयांवर पोचले. सद्य:स्थितीत बटाटा दर ९०० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. नागपूरच्या महात्मा फुले भाजी बाजार तसेच कळमणा बाजार समितीत बटाटा येतो. लगतच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांत लागवड होणारा बटाटादेखील बाजारात येत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. नागपूर शहरालगतच्या भागातही बटाटा घेतला जातो. किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो बटाट्याचे दर आहेत. बटाट्याची बाजारातील आवक सुरवातीला अडीच हजार क्‍विंटलची होती. त्यात वाढ होत ही आवक मध्यंतरी सहा हजार क्‍विंटलवर गेली होती. सद्य:स्थितीत बटाटा आवक साडेतीन हजार क्‍विंटलची असल्याचे सांगण्यात आले.

साताऱ्यात प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २७) बटाट्याची ५०० क्विंटल आवक झाली असून क्विंटलला ८०० ते १४०० असा दर मिळाला आहे. मागील सप्ताहाचा अपवाद वगळता बटाट्याचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. खटाव, कोरेगाव तालुक्यासह परजिल्ह्यातून बटाट्याची आवक होत आहे. २० जून बटाट्याची ५८० क्विंटव आवक होऊन क्विंटलला १२०० ते १४०० असा दर मिळाला आहे. १३ जून बटाट्याची ४५० क्विंटल आवक होऊन क्विंटलला ९०० ते १३०० असा दर मिळाला आहे. सहा जून बटाट्याची २७० क्विंटल आवक होऊन ८०० ते १३०० असा दर मिळाला आहे. बटाट्याची १५ ते २५ रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

परभणीत प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये
परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २७) बटाट्याचे दर प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.येथील मार्केटमध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथून आठवड्यातील दर शनिवारी बटाट्याची आवक होत असते. गेल्या महिनाभरातील प्रत्येक शनिवारी बटाट्याची ८०० ते १२०० क्विंटल झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी १००० ते १२०० रुपये दर मिळाले. गेल्या महिनाभरापासून बटाट्याचे दर स्थिर आहेत. शनिवारी (ता. २२) बटाट्याची १००० क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २७) बटाट्याची घाऊक विक्री प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दराने तर किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी अब्दुल सलाम यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटोची आवक वाढतीचकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील...
जळगावात वांगी १८०० ते २९०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सोलापुरात कांद्याला कमाल ११ हजार दरसोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...