पुण्यात बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी; दरात वाढ
पुण्यात बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी; दरात वाढ

पुण्यात बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी; दरात वाढ

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील थंडीच्या वाढलेल्या कडाक्याने विविध भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने घटल्याने आवक मंदावली आहे. परिणामी बटाटा, भेंडी, गवार, टोमॅटो, पावटा, सिमला मिरची आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे.  

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे २ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ टेम्पो, राजस्थानातून ७ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ४ ट्रक, गुजरात येथून भुईमूग सुमारे १०० गोणी, मध्य प्रदेशातून मटार सुमारे ३० ट्रक, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १२०० पोती, टोमॅटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, कोबी, सिमला मिरची, आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, फ्लॉवर १५ टेम्पो, गवार ७ टेम्पो,  पावटा ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, कांदा सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ३५०-४५०, बटाटा : १८०-२४०, लसूण : १०००-१७००, आले : सातारी ३००-५००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान सुरती ५००-६००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी १८०-२००, पांढरी : १५०-१६०, पापडी : २००-२२०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ८०-१००, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-३२०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १०००-१३००, गाजर : २८०-३००, वालवर : ३००-३२०, बीट : १४०-१५०,  घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : वाळलेली ७००, मटार : परराज्य २६०-३००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

फळबाजार  रविवारी (ता. ५) येथील बाजारात मोसंबी ५० टन, संत्री सुमारे १० टन, डाळिंब २००, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे सात हजार गोणी, कलिंगड १५ टेम्पो, सफरचंद ३ हजार बॉक्स, सीताफळ ३ टन, लिंबू सुमारे तीन हजार पोती, खरबूज ६ टेम्पो आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ८०-१२०, मोसंबी : (३ डझन) : १००-२५०, (४ डझन) : ४०-९०, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ८०-१३०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२०, पपई : ३-१५, सीताफळ : २०-१२५, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१४००, अमेरिकन डेलिशिअस ११००-१३००, महाराजा ७००-९००. बोरे (१० किलो) : चेकनट : ३८०-४००, उमराण : २०-४०, चमेली : ६०-१००, चण्यामण्या : ३००-३५०. स्ट्रॉबेरी (२ किलो) ७०-१७०.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. ५) कोथिंबीरीची सुमारे दोन लाख, मेथीची सुमारे ७० हजार जुड्यांची आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-८००, मेथी : ३००-६००, शेपू : ४००-६००, कांदापात : १००० -१५००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००- १५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-६००. हरभरा गड्डी -५००-८००

फुले फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ६-२०, गुलछडी : २०-५०, कापरी : १०-२०, शेवंती : ३०-६०, अ‍ॅस्टर : ३-६, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-९०, लिली बंडल : ६-१०, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन - ४०- ८०. 

मटण मासळी  गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ५) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे २५० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर मासळीची आवक आणि मागणी चांगली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. तर चिकन, मटणचे दर सुद्धा स्थिर होते. मात्र, इंग्लिश अंडीच्या शेकड्याच्या दरात १५ ते २० रुपये वाढ झाली होती.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)  पापलेट : कापरी : १४००- १५००, मोठे १४००-१५००, मध्यम : ९००, लहान ७००, भिला : ५००, हलवा : ४८०-५५०,  सुरमई : ४८०, रावस : लहान  ५५०, मोठा : ७५०,  घोळ : ७५०, भिंग : ३२०, करली : २८०, करंदी :सोलली   ४००, पाला : लहान ७००, मोठे : ११००- १२००, वाम : लहान पिवळी लहान  ६००, मोठी ८००, काळी : ४००, ओले बोंबील : १२०-१६०,

कोळंबी  लहान २८०, मोठे : ५५०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २८०, मोठे : ४००, मांदेली : १२०, राणीमासा :२०० खेकडे : २४०, चिंबोऱ्या :  ४८०-५५०.

खाडीची मासळी  सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान ३६० ,मोठे ७००, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : लहान १४० मोठे २४० , शेवटे : २४०, बांगडा : लहान १४० , मोठे २४०-२८०,  पेडवी : १००, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या :१६०-१८०, खुबे : १४०, तारली : १४०.

नदीची मासळी   रहू :१४०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २४०, चिलापी : ८०, खवली : २८०, आम्ळी : १००, खेकडे : २४० वाम : ६००.

चिकन  चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.

मटण  गावरान : शेकडा : ८५० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ५१९ डझन : ७२ प्रतिनग : ६

मटण  बोकडाचे : ५८०, बोल्हाईचे : ५८०, खिमा : ५८०-, कलेजी : ६२०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com