Agriculture news in marathi Potatoes cost Rs 800 to Rs 1,800 per quintal in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात बटाटा ८०० ते १८०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 जुलै 2021

पुणे ः ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १) आग्रा, इंदोर आणि गुजरात येथून बटाट्याची सुमारे २० ट्रक आवक झाली. त्यास दहा किलोला १२० ते १४० रुपये दर मिळाला.’’

पुण्यात प्रतिक्विंटलला १२०० ते १४०० रुपये  

पुणे ः ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १) आग्रा, इंदोर आणि गुजरात येथून बटाट्याची सुमारे २० ट्रक आवक झाली. त्यास दहा किलोला १२० ते १४० रुपये दर मिळाला’’, अशी माहिती येथील बटाट्याचे प्रमुख आडतदार राजेंद्र कोरपे यांनी दिली.  

‘‘कोरोना टाळेबंदीच्या विविध अटींमुळे हॉटेल, खानावळी, लग्न समारंभ आणि केटरिंगच्या कामांबरोबरच वडापावाच्या गाड्या अंशतः सुरु आहेत. त्यामुळे मागणीत घट आहे. गुजरातचे बटाटे चवीला तुलनेने गोड आहेत. त्यांची मागणी आणि दर कमी आहेत,’’ असे कोरपे यांनी सांगितले.

जळगावात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये 

जळगाव :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १) बटाट्याची २७ क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते १८०० आणि सरासरी १४०० रुपये दर मिळाला. आवक मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर व लगतचा भाग, नाशिक, नगर आदी भागातून होत आहे. जिल्ह्यात अपवाद वगळता लागवड होत नाही. दर मात्र गेले २५-३० दिवस स्थिर आहेत. 

नगरमध्ये क्विंटलला ९०० ते १४०० रुपये

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत २९१ क्विंटल बटाट्याची आवक झाली. त्यास ९०० ते १४०० व सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून बाजार समितीत बटाट्याची आवक वाढली आहे. दरातही सातत्याने चढ-उतार होत आहे. 

नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण १७० ते २४० क्विंटलपर्यंत आवक होत असते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आवकेत वाढ होत आहे. २८ जून रोजी २१३ क्विंटलची आवक झाली. त्या वेळी १००० ते १६०० व सरासरी १३०० रुपयांचा दर मिळाला. 

२६ जून रोजी ३४३ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १६०० व सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. २४ जून रोजी ५५७ क्विंटलची आवक होऊन ९०० ते १००० व सरासरी ९५० रुपयांचा दर मिळाला. १९ जून रोजी १९३ क्विंटलची आवक होत आहे. त्यास ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नांदेडमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये 

नांदेड : नांदेड शहरानजीक असलेल्या बोंडार बाजारात सध्या उत्तर प्रदेशातील बटाट्याची आवक सुरू आहे. रविवारी व बुधवारी होणाऱ्या लिलावात या बटाट्याला १००० ते १२५० रुपये दर मिळाला, अशी माहिती येथील ठोक व्यापाऱ्यांनी दिली. 

नांदेड शहरानजीक असलेल्या बोंडार बाजारात रविवारी तसेच बुधवारी कांदा, लसूण, आले, बटाट्याची आवक होऊन लिलाव होतो. सध्या बाजारात उत्तर प्रदेशातील शीतगृहातील बटाटा येत आहे. बुधवारी (ता. ३०) ८० ते १०० टन बटाट्याची आवक झाली. यास १००० ते १२५० रुपये दर मिळाला, अशी माहिती ठोक व्यापारी उस्मान शेख यांनी दिली. सध्या स्थानिक शेतकऱ्यांचा बटाटा बाजारात येत नसल्याचेही ते म्हणाले.

सोलापुरात प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बटाट्याची आवक वाढली. पण मागणी असल्याने त्यांचे दर स्थिर राहिले. बटाट्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बटाट्याची आवक प्रतिदिन ५०० ते १००० क्विंटलपर्यंत झाली. बटाट्याचे उत्पादन स्थानिक भागात अगदीच नगण्य आहे. बटाट्याची आवक पुणे, सातारा भागातून झाली. त्यास प्रतिक्विंटलाला किमान ८०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही बटाट्याची आवक ६०० ते १५०० क्विंटलपर्यंत राहिली. तर, दर प्रतिक्विंटलाला किमान ६५० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये दर मिळाला. पण आवक वाढत असली, तरी दरातील किरकोळ चढ-उतार वगळता दर स्थिर राहिले.

सांगलीत क्विंटलला ८०० ते १६०० रुपये

सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात बटाट्याची आवक कमी, अधिक होत आहे. गुरुवारी (ता. १) बटाट्याची ५३० क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १६००, तर सरासरी १२०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बुधवारी (ता. ३०) बटाट्याची ६५२ क्विंटल आवक झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल १३०० ते १६००, तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. मंगळवारी (ता. २९) बटाट्याची १०७६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते १६००, तर सरासरी १४०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. २८) बटाट्याची १२७० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते १६००, तर सरासरी १४०० रुपये दर होता.

शनिवारी (ता.२६) बटाट्याची ४२४ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल १२०० ते १६००, तर सरासरी १४०० रुपये दर होता. बाजार समितीत बटाट्याची आवक कमी, अधिक होत असली तरी दर स्थिर आहेत.

परभणीत क्विंटलला ९०० ते १२०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी (ता. २९) बटाट्याची ४०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल १२०० रुपये, तर सरासरी १०५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी बटाट्याची आवक होत असते. शनिवारी (ता.२६) बटाट्याची ८०० क्विंटल, तर मंगळवारी (ता. २९) ४०० क्विंटल आवक झाली. गुरुवारी (ता. १) बटाट्याच्या घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी मो. आवैस यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...