राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याभरात बटाट्याची आवक १२९ ते ३८७ क्‍विंटल दरम्यान झाली.
 Potatoes cost Rs.1000 to Rs.2600 in the state
Potatoes cost Rs.1000 to Rs.2600 in the state

औरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याभरात बटाट्याची आवक १२९ ते ३८७ क्‍विंटल दरम्यान झाली. बटाट्याला सर्वसाधारण १००० ते १२५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये बहुतांश बटाट्याची आवक ही मध्यप्रदेशातून होते. काही अंशी बटाटा स्थानिक परिसारतून व लगतच्या जिल्ह्यातूनही येतो. ७ जानेवारीला २८६ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याला १००० ते १४०० रुपये, तर सर्वसाधारण १२०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. ९ जानेवारीला ३४६ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे सर्वसाधारण दर १२५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

१० जानेवारीला २२२ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याला सर्वसाधारण १०५० रुपये दर मिळाला. ११ जानेवारीला २२६ क्‍विंटल आवक झाली. त्यावेळी सर्वसाधारण १००० रुपये दर मिळाला. 

बारा जानेवारीला १२९ क्‍विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर १२५० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ जानेवारीला आवक २३२ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर १२०० रुपये राहिला. १४ जानेवारीला ३८१ क्‍विंटल आवक होऊन १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० रुपये राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये क्विंटलला १०५० ते २१५० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १३) बटाट्याची आवक १८८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १०५० ते २१५०  रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५३० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता.१२) बटाट्याची आवक २१३५ क्विंटल झाली. त्यास ११०० ते २००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० रुपये होता. सोमवारी (ता.११) बटाट्याची आवक १५५२ क्विंटल झाली. त्यास १२०० ते २१६० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० रुपये मिळाला. शनिवारी (ता.९) बटाट्याची आवक १८६४ क्विंटल झाली. त्यास १०६० ते १९५० असा दर मिळाला. 

शुक्रवारी (ता. ८) बटाट्याची आवक २२२५ क्विंटल झाली. त्यास ११५० ते २१०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६१० रुपये होते. गुरुवारी (ता.७) बटाट्याची आवक १७७० क्विंटल झाली. त्यास १३३० ते २२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० रुपये होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत बटाट्याची आवक कमी जास्त होत आहेत.

सोलापुरात क्विंटलला सर्वसाधारण १८०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बटाट्याची आवक तुलनेने कमी राहिली. पण, मागणी असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बटाट्याची आवक रोज अर्धा ते एक टनापर्यंत राहिली. बटाट्याची आवक बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सर्वसाधारण १८०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात प्रतिदिन एक ते दीड टनापर्यंत आवक होती. दर प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सर्वसाधारण २००० रुपये आणि सर्वाधिक २४०० रुपये मिळाला. पंधरवड्यापूर्वीही काहीशी अशीच स्थिती राहिली. आवक तशी जेमतेमच राहिली. पण, दर प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सर्वसाधारण १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये मिळाला.

परभणीत प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये बटाट्याचे दर प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २००० रुपये, तर सर्वसाधारण १७५० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये मध्य प्रदेशातील इंदौर तसेच स्थानिक परिसरातून बटाट्याची आवक आठवड्यातील प्रत्येक शनिवारी होत आहे. शनिवारी (ता.९) बटाट्याची १२० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक खरेदीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये होते. गुरुवारी (ता.१४) बटाट्याची किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी मो. आहेस यांनी सांगितले.

अकोल्यात प्रतिक्विंटला १२०० ते २००० रुपये

अकोला ः येथील बाजारात बटाट्याची दिवसाला ५ ते ६ गाड्यांची आवक होत आहे. १२०० ते २००० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. या बाजारपेठेत इंदोर आणि खंडवा या ठिकाणांवरून बटाट्याची सध्या आवक सुरु आहे.

बाजारात इंदोरच्या बटाट्याचे दर १२०० ते १५०० दरम्यान आहेत. हा बटाटा काढणीनंतर थेट बाजारात येतो. तर खंडव्याचा बटाटा पाण्याने स्वच्छ धुतलेला राहतो. त्यामुळे बटाट्यावर चकाकी असते. या बटाट्याचा दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान मिळत आहे.

दोन्ही ठिकाणांवरून मिळून पाच ते सहा गाड्या येतात. एका गाडीत साधारणतः १०० क्विंटल बटाटा आणला जातो. अकोल्यात किरकोळ बाजारात बटाट्याची ३० ते ४० रुपयांदरम्यान विक्री केली जात आहे. सध्या आवक व उठाव दोन्ही चांगले आहे. त्यामुळे दरांमध्ये फारसा चढ -उतार दिसून येत नसल्याचे व्यापारी सुत्रांकडून सांगण्यात आले.

जळगावात क्विंटलला १८०० ते २६०० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) बटाट्यांची ४५० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २६००, असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील यावल, मध्य प्रदेश आदी भागातून होत आहे. दर कमी झाले आहेत.

सांगलीत क्विंटलला १५०० ते २००० रुपये

सांगली : येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. १४) बटाट्यांची ११८० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २०००, तर सर्वसाधारण १७५० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बटाट्याची आवक कमी अधिक सुरू आहे.

बुधवारी (ता. १३) बटाट्याची ७६० क्विंटल आवक झाली. दर १४०० ते २०००, तर सर्वसाधारण १७०० रुपये मिळाला. मंगळवारी (ता. १२) ३९० क्विंटल आवक झाली. दर १५०० ते २०००, तर सर्वसाधारण १७५० रुपये मिळाला.

सोमवारी (ता. ११) बटाट्याची १०५० क्विंटल आवक झाली. दर १४०० ते २०००, तर सर्वसाधारण १७५० रुपये मिळाला. बटाट्याची ९७ क्विंटल आवक झाली. दर १५०० ते २०००, तर सर्वसाधारण १८०० रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com