Agriculture news in marathi Poultry business in trouble in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात पोल्ट्री व्यवसाय अडचणीत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

धुळे : खानदेशात नंदुरबारमधील नवापूर, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा परिसर पोल्ट्री उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोरोनामुळे हा उद्योग गेले पाच महिने अडचणीत आहे.

धुळे : खानदेशात नंदुरबारमधील नवापूर, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा परिसर पोल्ट्री उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोरोनामुळे हा उद्योग गेले पाच महिने अडचणीत आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज, कोंबड्यांचे खाद्य, खरेदीदारांकडून मिळणारे कमी दर, यामुळे हा उद्योग अडचणीत सापडला आहे.

चांगल्या हंगामात नंदुरबार जिल्ह्यातून रोज तीन ते चार टन चिकनचा पुरवठा विविध भागात केला जातो. धुळ्यातही रोज एक दे दीड टन पुरवठा होत असतो. दाक्षिणात्य कंपन्या, मध्य प्रदेश भागातील खरेदीदार चिकन किंवा मांसल पक्षी खरेदीसाठी येतात. परंतु, हा उद्योग गेले सहा महिने अडचणीत आहे. चिकनची विक्री कमी झाली. नंतर मक्याचे दरही या उद्योगातील कमी मागणीमुळे कमी झाले. शेतकरीदेखील अडचणीत आले. हा उद्योग गतीने सुरू करायचा असेल, तर पूर्ण अर्थचक्र सुधारायला हवे. बँकांकडून जे कर्ज पोल्ट्रीधारकांनी घेतले, त्यावर सवलत हवी. 

पाच महिन्यांचे व्याज माफ करावे. कर्ज परतफेडीसाठी दोन वर्षे मुदत हवी आहे.  शासनाकडून सवलतही त्वरीत जाहीर व्हायला हवी.  या दरम्यान पोल्ट्रीधारकांना पक्ष्यांचे संगोपन, खाद्य, वैद्यकीय खर्च यासाठी निधी लागतो. हा खर्च पूर्वीएवढाच आहे. पण खरेदीदार दर कमी देतात. मजुरी महाग झाली आहे. फेब्रुवारी मध्ये कोंबड्यापासून कोरोना होतो, ही अफवा पसरली. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोल्ट्रीधारकांना सहन करावे लागले. यात शेतकऱ्यांच्या मक्याचे दरही घसरले. 

तामिळनाडू, केरळ भागात पक्षांचे कुठल्या आपत्ती, रोगराईत नुकसान झाले, तर पोल्ट्रीधारकांना कंपन्यांकडून चार रुपये प्रतिकिलोचा दर मिळतो.  परंतु, आपल्या राज्यात नुकसान झाल्यावर कोणताही मोबदला दिला जात नाही. बँकांकडून कर्ज वसुली सुरूच आहे. शेडसाठी सवलती नाहीत. याबाबत साक्री तालुका पोल्ट्री फार्मर संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार ए. बी.असटकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...