कुक्कुटपालन ठरू शकते महिला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ः डॉ. शरद गडाख

Poultry can be beneficial for female farmers Dr. Sharad Gadakh
Poultry can be beneficial for female farmers Dr. Sharad Gadakh

नगर ः ‘‘दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन काळजीपूर्वक केल्यास फायदेशीर ठरू शकते. पश्चिम महाराष्ट्रात सध्या ऊस शेती बरोबरच शाश्वत असे उत्पन्न दुग्ध व्यवसायातून मिळते. याच्या जोडीलाच नियोजनपूर्वक कुक्कुटपालन केले तर महिला शेतकऱ्यांसाठी ते नक्कीच फायदेशीर ठरू शकते,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन, विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान केंद्राच्या सभागृहात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकरी प्रथम प्रकल्पाच्या वतीने दुग्ध व कुक्कुट उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील दूध उत्पादकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद गडाख होते.

शेतकरी प्रथम प्रकल्पाचे समन्वयक प्रा. माधव देसाई, शेतकरी प्रथम प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. सुनील अडांगळे, प्रा. ए. व्ही. अत्तार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात डॉ. सुनील अडांगळे यांनी ‘परसबागेतील कुक्कुटपालन’, डॉ. विष्णू नरवडे यांनी ‘गायीचे आरोग्य व्यवस्थापन’ या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. माधव देसाई यांनी केले. या वेळी मानोरी येथील शंकर सपकाळ व शिवप्रसाद पवार यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मानोरी येथील श्री. बाबासाहेब आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील अडांगळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मानोरी, कान्हेगाव, तांदुळवाडी गावातील १०० पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधन सहयोगी डॉ. दीपिका आगलावे, रोहित उघडे, शिवाजी जाधव, सद्दाम शेख यांनी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com