बिबट्याच्या उपद्रवामुळे पोल्ट्रीतील हजारो पक्षी मृत्युमुखी

बिबट्याच्या उपद्रवामुळे पोल्ट्रीतील  हजारो पक्षी मृत्युमुखी
बिबट्याच्या उपद्रवामुळे पोल्ट्रीतील हजारो पक्षी मृत्युमुखी

नाशिक  : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील लष्करी हद्दीजवळील माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्मच्या छतावर रविवारी (ता.३१) बिबट्या आढळला. तेथून सुटका करून घेताना बिबट्याने केलेल्या उपद्रवामुळे पोल्ट्रीतील एक ते दीड हजार पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली.

परिसरात बिबट्या असल्याची माहिती समजल्यावर आजूबाजूच्या गावांतील बघ्यांनी गर्दी केली. गर्दी पाहून बिथरलेला बिबट्या पोल्ट्रीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याला तोंडाजवळ जखम झाली. अर्धा तास चाललेल्या या थरारानंतर दमलेला बिबट्या घाबरून बाजूला असलेल्या प्लॅस्टिक कागदाआड जाऊन बसला.

दरम्यान, बिबट्याच्या उपद्रवामुळे पोल्ट्री शेडमधील हजार ते पंधराशे पक्षी मृत झाले. त्यामुळे गुळवे यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती बेलगावचे सरपंच प्रा. नंदराज गुळवे यांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी ओंकार देशपांडे पथकासह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी परिस्थिती पाहून पिंजऱ्याची व्यवस्था केली.

नाशिक रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. एस. पी. थोरात, वनपाल पी. के. डांगे, बी. जे. राव, वनरक्षक पी. साबळे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com