शेतीपूरक उद्योग बुडाला, आधार द्या

poultry farmers
poultry farmers

औरंगाबाद: कोरोनाच्या केवळ अफवेमुळे जिल्ह्यातील शेतीपूरक व बेरोजगारीवर मात करण्यासाठी म्हणून स्वीकारलेला पोल्ट्री उद्योग बुडाला. अंदाजे साठ कोटींचा फटका एका औरंगाबाद जिल्ह्यात बसला आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक आधार द्यावा, अशी आर्त हाक औरंगाबाद जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांनी जिल्हा प्रशासनामार्फत गुरुवारी (ता. १२) शासनाला दिलेल्या निवेदनातून दिली आहे.  त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग व बरोजगारीवर मात करण्यासाठी म्हणून कुक्‍कुटपालन व्यवसाची निवड केली. जिल्ह्यातील जवळपास २५० ते ३०० शेतकरी बांधव या व्यवसायाशी जोडले जाऊन त्यांनी अंदाजे ८ ते १० लाख कुक्‍कुट पक्ष्यांचे संगोपन सुरू केले. या संगोपनावर सर्व शेतकऱ्यांचा प्रतिमहिना जवळपास १६ कोटी रुपये खर्च होतो, तर या उद्योगाची औरंगाबाद जिल्ह्यातील उलाढाल २५ कोटींवर आहे. या व्यवसायाशी जिल्ह्यातील एक हजार ते बाराशे मजुरी करणाऱ्या कुटुंबीयांचा व जवळपास दोन हजार छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा थेट संबंध आहे.  कोरोनो व्हायरस चिकन खाल्ल्याने पसरतो अशी अफवा पसरल्याने जनमानसात भीती पसरून चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. त्याचा परिणाम म्हणून कुक्‍कुटपालन करणाऱ्या पोल्ट्रीधारकांच्या कोंबड्या कुणीच विकत घेईना. दुसरीकडे हे चित्र बदलेल या आशेने त्या कुक्‍कुट पक्ष्यांना खाद्य खाऊ घालण्यात पोल्ट्रीधारकाचा पदरचा सर्व पैसा संपूण गेला. तर विक्रीसाठी तयार झालेले कुक्‍कुट पक्षी ६० ते ६५ रुपये तोटा सहन करून केवळ १० ते १२ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ आली. त्यामुळे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातच जवळपास ६० कोटी रुपयांचा फटका पोल्ट्रीधारकांना बसला.  पोल्ट्रीधारकांवर ओढावलेल्या या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात शासनाने आर्थिक स्वरूपात मदतीचा हात द्यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांनी केली आहे. निवेदन देतेवेळी पोल्ट्रीधारक शिवाजी क्षीरसागर, सुधाकर इधाटे, देविदास काळे, मजहर जावेद कुरेशी, मो. अस्लम मो. तय्यब, भगवान रोडे, मंगेश सूर्यवंशी, सत्यम गवळी, प्रकाश सुपे, अंकुश खंडागळे, दिलीप दाभाडे, गणेश आघाडे, रवी नवपुते, भरत कळसकर, संदीप पांडव, आप्पा गवळी, पोपटराव बोबडे यांच्यासह जवळपास दीडशेवर पोल्ट्रीधारकांची उपस्थिती होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com