नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
तऱ्हाडी, वरूळ परिसरात कुक्कुटपालक धास्तावले
तऱ्हाडी, जि. धुळे ः ‘बर्ड फ्लू’सारख्या रोगाच्या भीतीने अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांवर संकट आले आहे. यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत.
तऱ्हाडी, जि. धुळे ः शेतीला जोडधंदा म्हणून तऱ्हाडी आणि वरूळ परिसरात अनेक तरुणांनी पाच-सहा वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, ‘बर्ड फ्लू’सारख्या रोगाच्या भीतीने अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांवर संकट आले आहे. यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाला पसंती दिली. यात बॉयलर, कडकनाथ, कल्याणी गावरानी जातीच्या पिल्लांचे संगोपन करून दोन पैसे कमविण्याचे स्वप्न पाहिले. काही युवकांनी वेगवेगळ्या खासगी कंपन्यांसोबत करार करून सुमारे दहा हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाईल एवढी शेड निर्माण केली.
आधी कोरोनामुळे जतन केलेल्या कोंबड्यांना मातीमोल विक्री करावी लागली. आता लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्याने परत नव्या जोमाने कुक्कुटपालन व्यवसायाला प्रारंभ केला. तोच ‘बर्ड फ्लू’चे सावट आहे. त्यामुळे अनेक कुक्कुटपालक धास्तावले आहेत.
अफवेने प्रत्येक व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. कारण एका फार्मवर सुमारे पाच ते दहा हजारांपर्यंत पक्षी आहेत. एका पिल्लाचा सुमारे दीड महिने सांभाळ करताना सुमारे १७० ते १८० रुपये खर्च येतो, तर सध्या ५० ते ६० रुपये या किरकोळ दराने कोंबडी विक्री करावी लागत आहे.
अनेकांनी मिळेल त्या दराने कोंबड्यांची विक्री केल्याने वेळेआधीच अनेक पोल्ट्रीफार्म रिकामे झाल्याचे चित्र तऱ्हाडी व वरूळ परिसरात आहे.
शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन करावे, असा सल्ला अनेकांकडून मिळतो.
तीन वर्षांपासून पोल्ट्रीफार्म व्यवसाय करीत आहे. हा व्यवसाय चांगला आहे. मात्र, पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांवर अनेक आजाराच्या अफवा पसरल्याने हा व्यवसायही आतबट्ट्यात आल्याने डोक्यावर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
- शोएब खाटीक, पोल्ट्री व्यावसायिक, वाघाडी (जि.धुळे).
- 1 of 1028
- ››