Agriculture news in Marathi Poultry farming in the backyard is like an ATM | Page 2 ||| Agrowon

परसबागेतील कुक्कुटपालन ‘एटीएम’सारखे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

ग्रामीण भागात परसबागेतील कुक्कुटपालन हे ‘एटीएम’सारखे काम करते, असे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले. 

अकोला : ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात कुक्कुटपालन व्यवसायाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. अंडी व मांस उत्पादन होत असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात बेरोजगार तरुण, ग्रामीण महिला, अल्पभूधारक शेतकरी आणि लघू उद्योगात सामील असलेल्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मोठी क्षमता आहे. ग्रामीण भागात परसबागेतील कुक्कुटपालन हे ‘एटीएम’सारखे काम करते, असे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले. 

‘माफसू’अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुक्कुटपालन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे कृषी उपसंचालक अरुण वाघमारे उपस्थित होते. ते या वेळी म्हणाले, की परसबागेतील कुक्कुटपालन केल्याने ग्रामीण भागात दैनंदिन गरजा भागविल्या जाऊ शकतात. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘परसबागेतील शास्त्रोक्त कुक्कुटपालन’ या तांत्रिक माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक योगेश देशमुख, वरुण दळवी उपस्थित होते.

प्रशिक्षणात कोंबड्याचे व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, आजार व त्यावरील उपचार, विक्री व्यवस्था या विषयावर तज्ज्ञ प्रा. डॉ. सतीश मनवर व डॉ. एम आर. वडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश मनवर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. एम. आर. वडे यांनी तर डॉ. गिरीश पंचभाई यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पी. एल. ठाकूर यांनी पुढाकार घेतला.


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...