agriculture news in marathi Poultry farming is a good income business: Dr. Devasarkar | Agrowon

कुक्कुटपालन चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय : डॉ. देवसरकर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

औरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य, पाणी इतर व्यवसायाच्या तुलनेत कमी लागते. हा कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी  व्यक्त 
केले. 

औरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य, पाणी इतर व्यवसायाच्या तुलनेत कमी लागते. हा कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी  व्यक्त 
केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादतर्फे चार दिवसीय ऑनलाइन वेबिनार घेण्यात आले. परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. देवसरकर बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण समन्वयक डॉ. अनिता  जिंतूरकर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले. 

प्रशिक्षणात २० महिला प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. परसबागेतील कुक्कुटपालनाचे महत्त्व, परसबागेतील कुक्कुटपालनासाठी कोंबड्यांच्या जाती, कुक्कुटपालनातील रोग,आजार, लसीकरणपद्धती, यावर डॉ. जिंतूरकर यांनी मार्गदर्शन केले. 

कुक्कुटपालनाची आवश्यकता, महिला उद्योजक राजमाता पुरस्कारप्राप्त सुनंदा क्षिरसागर यांनी खाद्य निर्मिती व्यवसायातील घडामोडी बद्दल मार्गदर्शन केले. 

शिवाजी क्षीरसागर यांनी कोंबडी पालनाचे अर्थशास्त्र समजावून सांगितले. समारोपात कुक्कुट पालनाचे महत्त्व, परसातील अंड्यांची मागणी, यावर डॉ एस. बी. पवार यांनी मार्गदर्शन केले. 

डॉ. झाडे म्हणाले, ‘‘ ‘केव्हीके’च्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. कुक्कुटपालन ग्रामीण महिलांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे.’’ 

या कार्यक्रमासाठी डॉ. बसवराज पिसुरे, प्रा. गीता यादव, डॉ. दर्शना भुजबळ, अमरीन सय्यद, डॉ. अशोक निर्वळ, शिवा काजळे, इरफान शेख आदींनी सहकार्य केले. यावेळी वेबिनामध्ये शेतकरी, तज्ज्ञांनी भाग घेतला. त्यांना तज्ज्ञांतर्फे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 


इतर बातम्या
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
खामगाव तालुक्यात बंधाऱ्याची निर्मितीबुलडाणा ः ‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍...
सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी...अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
कडा येथे कांद्याचे बनावट बियाणे जप्तनगर ः नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता....
कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा...कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या...
दुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘...पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या...
आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता...नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत...
सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस...
सांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ, दर...सांगली ः गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे...
आर्वी येथील स्मशानात उगवले पीकरूपी सोनेआर्वी, जि. वर्धा : येथील सेवानिवृत्त प्राध्यापक...
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार...बुलडाणा : जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
नगरमध्ये पावसाची दडी;  पेरण्या खोळंबल्यापुणे नगर : नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस सुरू...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...नागपूर : कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या...
सीताफळाचा फळपीक विमा योजनेत समावेशजालना : ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेळोवेळी विविध...
धानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या  मिलर्सना...गोंदिया : गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून...
नांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘...नांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक...
खतांच्या कार्यक्षम वापरासाठी...नाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील...