जालना जिल्ह्यातील वानडगावात महिला गटाद्वारे कुक्‍कुटपालन

Poultry farming by women group in Wandgaon in Jalna district
Poultry farming by women group in Wandgaon in Jalna district

जालना :  जिल्ह्यातील वानडगाव या कृषी विज्ञान केंद्र खरपुडीच्या दत्तक गावात गत वर्षभरापासून ‘केव्हीके’द्वारे गटाने अंडी उत्पादनासाठी ग्रामप्रिया जातीच्या कुक्‍कुटपक्ष्यांच्या संगोपनाचा प्रयोग सुरू केला आहे. त्यासाठी प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिकांतर्गत २० महिलांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातर्फे देण्यात आली. 

कुक्‍कुटपालनासाठी निवडलेल्या २० महिलांच्या गटाला एक महिन्याचे लसीकरण केलेली प्रत्येकी १० ग्रामप्रिया पिल्ले अंड्यांसाठी अशी एकूण २०० कोंबडी पिल्ल कृषी विज्ञान केंद्रातर्फे  देण्यात आली. त्यांची वाढ झाल्यानंतर पाच महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरू झाले.

साधारणत: २०१९ पासून अंडी उत्पादनास सुरुवात झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांपासून दररोज प्रत्येक महिलेला सरासरी सात ते आठ अंडी कुक्‍कुटपालनातून मिळाली. त्यामधून साधारणत: ७० ते ८० रुपये प्रत्येक महिलेला उत्पन्न मिळणे सुरू झाले. त्यामुळे महिन्याला दोन ते अडीच हजार अतिरिक्त उत्पन्न सुरू झाले आहे. अंडी उत्पादन करणाऱ्या या गटाकडून आता पिल्ले उत्पादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढच्या वर्षीच्या अंडी उत्पादनासाठी हे नियोजन सुरू असल्याची माहिती डॉ. एच. एम. आगे यांनी दिली. 

डॉ. आगे म्हणाले, ‘‘ग्रामप्रिया ही हैद्राबाद येथील आयसीएआर पुरस्कृत कोंबडी प्रकल्प संचालनालयाने तयार केलेली अंड्यासाठी प्रसिद्ध कोंबडी जात आहे. ही कोंबडी १८ महिन्यांत २३० अंडी देते. सर्व महिलांनी कृषी विज्ञान केंद्राचे कोंबडीपालन प्रशिक्षण केले आहे. त्याचा त्यांना कोंबडी संगोपनात घरगुती खाद्य तयार करणे, शेडचे व्यवस्थापन, अंडी विक्री व लसीकरण करण्यात उपयोग होत आहे.’’

शाश्वत शेतीसाठी जोड व्यवसाय आवश्‍यक

‘केव्हीके’च्या गृहविज्ञान तज्ज्ञ एस. आर. गायकवाड यांनी महिलांना प्रयोगासाठी एकत्रित करून बचत गटाद्वारे हा कोंबडी व्यवसाय मोठा करण्यासाठी शासन योजनाचा लाभ कसा मिळवता येतो, याची माहिती दिली. ‘केव्हीके’चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ सोनुने यांनी भविष्यात शेती शाश्वत करण्यासाठी कोंबडीपालन, शेळीपालन रेशीम उद्योग यांसारख्या जोड व्यवसायाची जोड देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्‍त केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com