सातारा जिल्ह्यात ‘पोल्ट्री’चे १५० कोटींचे नुकसान

सोशल मीडियातील चुकीच्या प्रकारामुळे सध्या पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. कोरोनाचा आणि पोल्ट्री व्यवसायाचा कसलाही संबंध नाही. याउलट कमी खर्चात सर्वाधिक प्रोटीन चिकनमधून मिळत आहे. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढत आहे. यामुळे लोकांना चिकनबाबतचे गैरसमज दूर करून चिकन, अंडी, मांस घ्यावे. - विजय गोरंबेकर-पाटील, पोल्ट्री अभ्यासक तसेच मुख्य अधिकारी बॉयलर विभाग, भैरवनाथ पोल्ट्री फार्म, सातारा.
poultry
poultry

सातारा : कोरोना प्रादुर्भावाच्या अफवेमुळे गेल्या महिन्यापासून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सुमारे १५० कोटींचा फटका बसला आहे. यामुळे पोल्ट्रीधारक शेतकरी, विक्रेते तसेच पोल्ट्री फार्म कंपन्या कोलमडून पडू लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या २३००च्या वर बॉयलर कोंबडी, ५५० देशी कोंबड्या तर ३०० च्या लेअर पोल्ट्री व्यवसाय शेतकरी करत आहेत. करार पद्धतीने हा व्यवसाय शाश्वत वाटत असल्यामुळे ६५ टक्के शेतकरी करार तर ३५ टक्के स्वत:चा व्यवसाय करतात. मात्र, कोरोनाच्या केवळ अफवेमुळे एकट्या फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाला १५० कोटीचा फटका बसला आहे. यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यासह चिकन विक्रेत तसेच पोल्ट्री फार्म कंपन्यांना कोलमडल्या आहेत.  जिल्ह्यात वर्षाकाठी १५०० ते २००० कोटी रुपयांची उलाढाल पोल्ट्री व्यवसाय होते. प्रत्येक महिन्याला करार पद्धतीने ४८ लाख पक्षी (पिल्ले) बॉयलर तर ५० हजार देशी पक्षी व दहा हजार लेअर पक्षी दिले जातात. यातून तीन हजार शेतकऱ्यांना व्यवसाय निर्माण होता. मात्र, कोरोनाच्या अफवेमुळे शेतकऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. पोल्ट्रीसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते रखडणार असून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रक्कमेत वाढ होणार आहे.   

३० लाख पक्षी पडून कोरोनामुळे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याची कोंबड्या खरेदी झालेली नाही. सध्या या कोंबड्याचे वजन तीन किलोवर गेले आहे. हा लॅाट पूर्णपणे वाया जाणार आहे. सध्या सर्व शेडात मिळून सुमारे ३० लाख पक्षी पडून आहेत. या कोंबड्याचे काय करायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 

फुकट देण्याची वेळ चुकीच्या अफवांमुळे मागील महिन्यापासून चिकन खरेदी कमी कमी होत गेली. यामुळे चिकनचे दर प्रतिकिलो १५० रुपयांवरून ५० रुपयापर्यंत आले. मागणी कमी आणि पुरवठा जास्त होत असल्याने अजून दर कमी ते १० ते २० रुपये नगाप्रमाणे विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांनी स्वत: विक्रीचा प्रयत्न केले. मात्र, फारसे यश आले नसून चिकन विक्रेते व शेतकऱ्यांच्यात वादावादी होऊ लागली आहे.     सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय

  • जिल्ह्यात वर्षाकाठी पोल्ट्री व्यवसायात १५०० ते २००० कोटी़ंची उलाढाल 
  • जिल्ह्यात तीन हजार पोल्ट्री युनिटची संख्या
  • एकूण पोल्ट्री व्यवसायात ६५ टक्के करार तर ३५ वैयक्तिक शेतकरी करतात
  • महिन्याला ५८ लाखांवर पिले संगोपनासाठी दिली जातात
  • शेतकऱ्यांबरोबर विक्रेते, पोल्ट्री फार्म कंपन्या अडचणीत 
  • शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते, वीजबिल थकले
  • जिल्ह्यात कुक्कटपालन शेडमध्ये ३० लाख पक्षी पडून
  • प्रतिक्रिया आमच्यासाठी पोल्ट्री व्यवसाय हा मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे हाताला काम मिळाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. लोकांनी चुकीच्या पोस्ट शेअर केल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. पक्ष्यांची मागणी नसल्यामुळे माझे पक्षी घेतले नसल्यामुळे शेड ओस पडले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेडमध्ये पक्षी पडून आहेत.  - वैभव बर्गे, पोल्ट्री धारक शेतकरी चिंचणेर, ता. सातारा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com