agriculture news in Marathi poultry got 150 crore setback by CORONA Maharashtra | Agrowon

कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५० कोटींचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

सोशल माध्यमात कोरोना विषाणूविषयी अफवा पसविणाऱ्यांवर सायबर क्राइमकडे तक्रार केली आहे. त्याचा तपास चालू आहे. अजूनही अशी अफवा पसरवली तर त्यांची तक्रार केली जाईल. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा.
— सच्चिंद्रप्रतापसिंग, पशुसंवर्धन आयुक्त, पुणे

पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. मात्र, चार फेब्रुवारीनंतर सोशल मीडियावर या विषाणूचा कुक्कुटपालनावर परिणाम होतो, अशी अफवा पसरवली गेली. त्यामुळे कुक्कुटपालन व त्या संलग्न शेतकऱ्यांचे आत्तापर्यंत सुमारे १५० कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती वेंकिजचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी दिली.  

पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने ‘कोरोना विषाणू’ या विषयावर गुरुवारी (ता. २०) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग, एनआयव्हीचे शास्त्रज्ञ बी. व्ही. तांदळे, ससून हॉस्पिटलचे उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे आदी उपस्थित होते.

श्री. पेडगावकर म्हणाले की, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषगांने कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय माहिती पसरविली गेली. यामुळे राज्यात चिकनचा तीन ते साडेतीन हजार कोटी टन असलेला खप कमी होऊन तो दोन हजार टनांवर आला. राज्यात जवळपास दररोज १० ते ११ कोटींचा फटका बसला आहे.

त्यानंतर शासनाने कोरोनाचा कुक्कुटपालन मांसावर कुठलाही परिणाम होत नाही, अशी अधिसूचना काढून प्रसार होत नसल्याचा संभ्रम दूर केला. मात्र, हा व्यवसाय अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. सध्या चिकनचा खप २४०० ते २५०० टन एवढा आहे. 

श्री. सिंग म्हणाले की, कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असून, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमित होतो. तथापि, कुक्कुट पक्ष्यांमधील कोरोना विषाणू (इन्फेक्शस ब्रॉंकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये विषाणू संक्रमित झाल्याचे संदर्भ नाहीत.

आपल्याकडे चिकन व मटण उकळून-शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. तरी ग्राहकांनी सोशल मीडिया-फेसबुक व व्हॉट्सअॅप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेली माहिती, बातम्या, अफवांवर विश्वास ठेवू नये. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...