Agriculture news in Marathi Poultry growers should get discounted electricity tariff | Agrowon

पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत मिळावी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत अफवा पसरविण्यात आल्याने पोल्ट्री उत्पादक अडचणीत सापडला आहे. कोंबड्यांच्या दरात घसरण झाल्याने खर्च निघणे अशक्य झाले आहे. खुल्या शेडच्या तुलनेत खर्च अधिक असल्याने वातानुकूलित पोल्ट्री शेड उभारणारे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत. अडचणी दूर होऊन पोल्ट्री व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. अशा वेळी कुकुटपालक शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळावी, अशी मागणी जिल्ह्यातील वातानुकूलित पोल्ट्री उत्पादकांनी केली आहे. 

पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत अफवा पसरविण्यात आल्याने पोल्ट्री उत्पादक अडचणीत सापडला आहे. कोंबड्यांच्या दरात घसरण झाल्याने खर्च निघणे अशक्य झाले आहे. खुल्या शेडच्या तुलनेत खर्च अधिक असल्याने वातानुकूलित पोल्ट्री शेड उभारणारे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत. अडचणी दूर होऊन पोल्ट्री व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. अशा वेळी कुकुटपालक शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत मिळावी, अशी मागणी जिल्ह्यातील वातानुकूलित पोल्ट्री उत्पादकांनी केली आहे. 

पोल्ट्री व्यवसाय हा कृषीपूरक असल्याने कुकुटपालक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतियुनिट दराने वीज खरेदी करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हा वीज दर उत्पादकांसाठी अधिक वाटत आहे. यातच वातानुकूलित पोल्ट्री शेडची आवश्‍यक यंत्रणा, खाद्य, पाणी, औषध पुरवठा आदी स्वयंचलित यंत्रणा चालविण्यासाठी अधिकची वीज लागत असल्याने या कुकुटपालांच्या समस्यांमध्ये भरच पडत आहे, ही परिस्थिती कधी सुधारेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना काही दिवस आणखी सवलत देण्याची आवश्‍यकता आहे. 

पोल्ट्री उत्पादकांना कृषी पंपाप्रमाणे सवलतीच्या दरात वीज मिळाली, तर उत्पादकांना पुन्हा उभे राहण्यास बळ मिळेल, असे मत औरंगपूर (ता. जुन्नर) येथील कुकुटपालक उत्तम डुकरे यांनी व्यक्त केले. वरवंड (ता. दौंड) येथील सागर दिवेकर म्हणाले, अफवांमुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. यातच ग्रामीण भागात रोहित्रावर अधिक ग्राहकांची जोडणी असल्याने कमी दाबाने वीज मिळत आहे. त्यामुळे विजेसाठी डिझेल जनरेटरचा वापर करावा लागत आहे.

खुल्या शेडच्या तुलनेत वातानुकूलित शेडसाठी विजेकरिता अधिक खर्च येत आहे. दरमहा २० ते २५ हजार रुपये वीजबिल येते. ‘कोरोना’मुळे खुपच फटका बसला आहे. खाद्य द्यायला परवडत नसल्याने काही पोल्ट्रीधारकांना पक्षी मारून टाकावे लागले. बकऱ्या किंवा मेंढ्या असतील तर त्यांना जास्त दिवस ठेवता येते. मात्र, कोंबडी योग्य वेळी विक्री करावी लागते. त्यामुळे व्यवसायिकांसमोर संकट वाढतच आहे. या पोल्ट्रीधारकांना शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. 
- सुरेंद्र शिळीमकर, वीरवाडी, नसरापूर, ता. भोर


इतर बातम्या
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...