चार आण्याची झाली कोंबडी; खर्च झाला बारा आणे...

मी मागील ५ वर्षांपासून बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा येथे पोल्ट्री व्यवसाय करीत आहे. १५,००० पक्षांची क्षमता आहे. एका पक्षावर १३३ रुपये खर्च होत असून हातात ८० रुपये पडत आहेत. एका पक्ष्यामागे ५० रुपयांवर तोटा पोल्ट्रीचालकाला झेलावा लागत आहे. पक्ष्यांची ग्रोथ वाढवावी लागत असून, पक्षी मरण्याचे प्रमाणही वाढत आहे. खाद्यान्न, औषधावरील खर्चही वाढलेला आहे. -नीलेश सुभाषराव झोंबाडे, पोल्ट्रीचालक, गोरव्हा जि. अकोला
poultry
poultry

अकोला ः कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योग आर्थिक संकटात आला आहे. ब्रॉयरल कोंबडीचे दर घसरल्याने या उद्योगात काम करणाऱ्यांना आता पुढील बॅचेस टाकाव्यात की नाही, अशी द्विधा मनःस्थितीला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात शेतीला पूरक म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. सर्वच तालुक्यांमध्ये छोटे-छोटे पोल्ट्री फार्म, परसबागेतील कुक्कुटपालन करणारे वाढत आहेत. गेल्या दीड महिन्यात पोल्‍ट्रीला आर्थिक संकटाचा सामना करावं लागत आहे. वास्तविक मागील सहा-आठ महिन्यांपासूनच खाद्याच्या दरवाढीचा ताण सहन करावा लागत होता. त्यातच आता कोरोनाची अफवा पसरल्याने विक्रीवर थेट परिणाम झाला. या वर्षात ९० रुपयांवर पोचलेले प्रतिकिलोचे दर आज ४० ते ५० रुपयांदरम्यान आले आहेत. दर तर कमी झालेच शिवाय मागणी २५ टक्क्यांवर आल्याचे पोल्ट्रीधारक सांगत आहेत. पोल्ट्री चीक साधारणतः २५ रुपयांपेक्षा अधिक किमतीला घ्यावे लागते. त्यानंतर त्याच्या पालन पोषणासाठी सरासरी खाद्यान्नावर १०५ ते १२५ रुपयांपर्यंत खर्च आहे. सोबतच मजुरी व औषधोपचाराचा तीन ते पाच रुपयांदरम्यान खर्च आहे.  असा प्रति कोंबडी १५० रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. त्यानंतर दोन किलो वजनाची कोंबडी तयार होते. सध्या ४० ते ५० रुपयांदरम्यान दर मिळत आहे. म्हणजेच १५० रुपये खर्च करून पोल्ट्रीधारकाच्या हातात अवघे ८० रुपये पडत आहेत. एका बॉयलर कोंबडीमागे ७० रुपयांचा थेट तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. असलेल्या दरात पोल्ट्रीधारक माल पुरवठा करायला तयार आहेत. परंतु खरेदीदार तयार नाहीत. कोंबडीची मागणी २५ टक्क्यांवर आलेली आहे. परिणामी आता कोंबड्यांना अधिक दिवस जगवावे लागत आहे. यासाठी खाद्यान्न व इतर खर्च वाढत आहे. कोंबडीचे वजन वाढत असले तरी खर्चाच्या तुलनेत ते परवडणारे राहिलेले नाही. आयुर्मान वाढविल्याने मरतुकीचे प्रमाण वाढू लागले आहे. ब्रायलर वाढविण्यासाठी केलेला खर्च निघणे दूरच असताना हे नुकसानही झेलावे लागत आहे. प्रतिक्रिया सध्या बाजारात ४५ ते ५० रुपयांचा दर मिळत आहे. या वर्षी सर्वाधिक १२० रुपये दर भेटला. एका पक्ष्यावर दीडशे रुपयांपेक्षा अधिक खर्च होत असून, हातात १०० रुपयेही पडत नाहीत. अशा तोट्यामुळे आता पुढील बॅच टाकावी की नाही असा प्रश्‍न आले. मागील सहा वर्षांत पहिल्यांदा अशा परिस्थितीला सामोरे जात आहोत. -शेख नईमोद्दीन शेख जासोद्दीन, मजलापूर जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com