agriculture news in Marathi poultry industry got 120 crore setback by CORONA Maharashtra | Agrowon

‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री उद्योगाचे १२० कोटींचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कोरोना विषाणूच्या भीतीने लोकांचे चिकन खायचे प्रमाण कमी झाले  आहे. यामुळे चिकनची मागणी घटल्याने ७० ते ७५ रुपये जिवंत कोंबडीच्या खरेदीचे दर ४० रुपयांपर्यंत कमी झाले आहे. आठवड्याला चार कोटी जिवंत कोंबड्यांची विक्री १ कोटीने कमी झाली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांत सुमारे १०० ते १२५ कोटींचे नुकसान झाले आहे.
- कुणाल पाथरे, कार्यकारी संचालक, पोल्‍ट्री ब्रीडर ॲण्ड फार्मर वेलफेअर असोसिएशन 

पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण असताना या विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परिणामी चिकनची मागणी घटल्याने गेल्या २० दिवसांत पोल्ट्री उद्योगाला सुमारे १२० कोटींचा फटका बसला आहे, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत जनजागृती होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून घटलेली मागणी वाढत असून, चिकनची बाजारपेठ पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

याबाबत पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची ब्रॉयलर चिकनची मागणी दिवसाला २ हजार ८०० टनांची आहे. मात्र, कोरोनो विषाणूबाबतच्या अफवेमुळे आणि समाजमाध्यमांमधील फिरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे गेल्या २० दिवसांत चिकनची मागणी ६०० टनांनी घटली आहे. यामुळे १३० रुपये प्रतिकिलोच्या बाजारभावानुसार गेल्या २० दिवसांत सुमारे १०० ते १२० कोटींचे नुकसान झाले आहे.

मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने या अफवांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे बाजारपेठ पुन्हा पूर्वपदावर येत असून, गेल्या २० दिवसांत १ हजार ६०० टनांपर्यंत कमी झालेली मागणी आता २ हजार २०० टनांपर्यंत वाढली आहे. काही दिवसांत ही बाजारपेठ पूर्वपदावर येईल असे आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’ 

लिफ्टिंग दर ४० रुपयांवर
कोरोना विषाणूच्या अफवेमुळे गेल्या १५-२० दिवसांपासून चिकनची मागणी  ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची दररोजची मागणी सुमारे १५० ते २०० टन एवढी असते. ती मागणी आता १०० टनांपर्यंत घटली आहे. तर चिकनचे १८० रुपये असणारे दर आता १२० रुपये आहेत. तर आमच्या जिवंत कोंबडीचे खरेदीचे दर ७५ ते ८० रुपयांवरुन, ४० रुपये प्रति किलो पर्यंत झाले आहे. मात्र, कोंबडीपासून कोरोना विषाणूचा फैलाव होत नसल्याचे समोर येत असल्याने मागणी वाढायला सुरुवात झाली आहे, असे पुणे जिल्हा ब्रॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
‘कोरोना’च्या भीतीमुळे कोंबड्यांच्या मागणीबरोबरच दरदेखील घटले आहेत. माझा या महिन्यात १० हजार पक्षी विक्रीचा अंदाज होता. मात्र ७ हजारच विक्री झाली. तर, दर ५५ रुपये प्रति किलो अपेक्षित होता. आता ३० रुपये मिळत आहे.
- संदीप येवले, सांडगेवाडी, पलूस, जि. सांगली


इतर अॅग्रो विशेष
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...