agriculture news in Marathi, poultry industry has setback due to feed cost hike, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खाद्य दरवाढीचा विदर्भातील पोल्ट्री व्यवसायाला फटका
विनोद इंगोले
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

माझ्याकडे सरासरी दीड लाखावर पक्षी राहतात. त्यातील ४५ ते ५० हजार पक्षी कमी केले आहे. या माध्यमातून ९० हजार रोजचे अंडी उत्पादन सद्या कमी करण्यावर भर दिला आहे. पशुखाद्यातील वाढत्या दरामुळे हा निर्णय घेतला. उत्पादकता खर्च वाढता असून सद्या सण, उत्सवामुळे अंड्यांना मागणी देखील कमी आहे. दिवाळीनंतर पक्ष्यांची संख्या वाढविली जाईल. सात एकरावर स्वतःच मका लागवड केली आहे. 
- रवींद्र मेटकर, मातोश्री पोल्ट्री फार्म, अंजनगावबारी, अमरावती.

अमरावती ः राज्यातील मक्‍यावर लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री उद्योगाला राज्यातून होणाऱ्या मक्‍याचा पुरवठा थांबला आहे. परिणामी, विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांची मध्य प्रदेशातून आवक होणाऱ्या महागड्या मक्‍यावरच भिस्त आहे. अंड्यांचा उत्पादकता खर्च यामुळे वाढीस लागल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कोंबड्यांचे संगोपन कमी केले असून दिवाळीनंतरच पोल्ट्री व्यवसायातील ही मंदी दूर होण्याची शक्‍यता व्यावसायिकांनी व्यक्‍त केली. 

विदर्भात नजीकच्या काळात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायाला शेतकऱ्यांची; तसेच व्यावसायिकांची देखील वाढती राहिली आहे. सद्यस्थितीत सुमारे १५ लाख पक्ष्यांचे संगोपन या व्यवसायाच्या माध्यमातून होते. 

अमरावती जिल्हा तर पोल्ट्रीचे हब म्हणून नावारूपास आला असून विदर्भातील १५ लाखांपैकी दहा लाख पक्ष्यांचे संगोपन एकट्या अमरावती जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून होते. अमरावती शहराच्या आजूबाजलाच या व्यवसायाचा विस्तार आहे. दीड लाखावर कोंबड्यांचे संगोपन एका-एका पोल्ट्री व्यवसायांकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

देशभरातील बाजारपेठेत या ठिकाणावन अंड्यांचा पुरवठा होतो. त्यामध्ये मुख्यत्वे मध्य प्रदेशातील इंदूरचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. सद्या मात्र कोंबडी खाद्याच्या दरात आलेल्या तेजीमुळे येथील व्यावसायिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मजुरी खर्चासोबतच पशुखाद्यातील आलेल्या तेजीचा फटका बसल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कोंबड्यांचे संगोपन कमी केले आहे.

पोल्ट्री व्यावसायिक रावणकर यांच्याकडे वर्षभर १ लाख ६० हजार कोंबड्यांचे संगोपन होते. त्यांनी पशुखाद्य दरातील वाढीमुळे पक्ष्यांची संख्या १ लाखावर आणली आहे. त्यांच्याकडील दरदिवसाचे अंडी उत्पादन ८० हजार आहे. महाराष्ट्रातील जळगाव, बुलडाणा भागातून विदर्भात मका पुरवठा होतो; परंतु त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने आता केवळ मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून येणाऱ्या मक्‍यावर पोल्ट्री व्यावसायिकांची भिस्त आहे.
 
मध्य प्रदेशातील हा मका हैदराबाद भागात २६०० रुपये क्‍विंटल, अमरावतीत २४०० रुपये क्‍विंटल; तर  नाशिक, पुणे विभागात २५०० रुपये क्‍विंटलने पुरवठा होत आहे. पशुखाद्याच्या दरात वाढ झाली असली तरी  अंड्याचे घाऊक दर तीन रुपये आहेत. अंड्यांचा उत्पादकता खर्च चार रुपये असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने व्यावसायिकांनी त्यांच्याकडील पक्षीसंख्या कमी करण्यावर भर दिला आहे. दिवाळीनंतर अंड्यांना उठाव येणार असल्याने तोवर वेट ॲण्ड वॉचचे धोरण पोल्ट्री व्यावसायिकांनी अवलंबले आहे. 

खाद्याचे दर असे...

खाद्य   पूर्वी   आता
सोयाबीन ढेप (टन)   २५००० रुपये ३५००० रुपये
मका (क्विंटल) १३०० रुपये २४०० रुपये
तांदूळ चुरी (क्विंटल) १३०० रुपये  १९०० रुपये

 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...