agriculture news in Marathi poultry industry in pressure Maharashtra | Agrowon

कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची सावध चाल 

मुकुंद पिंगळे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यातील अस्पष्ट चित्र, खेळत्या भांडवलाचा अभाव आणि मजूरटंचाई असे प्रश्न उपस्थित झाले.

नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यातील अस्पष्ट चित्र, खेळत्या भांडवलाचा अभाव आणि मजूरटंचाई असे प्रश्न उपस्थित झाले. परिणामी राज्यभरात ब्रॉयलर पक्षांची प्लेसमेंट कमी होऊन निम्म्यावर आली आहे. सध्या चिकनच्या मागणीत वाढ होत असली तरीही पुरवठा संतुलित आहे. त्यामुळे भांडवलाची उपलब्धता व पुन्हा नुकसान होण्याची जोखीम नको म्हणून पोल्ट्री उद्योगाची सावध चाल असल्याचे चित्र आहे.

 राज्यात मुंबई, पुणे यांसह गुजरात व मध्य प्रदेशात मोठी बाजारपेठ आहे. मात्र अफवांमुळे विक्री मंदावली आणि दरातील निच्चांकी घसरण होऊन उत्पन्नात मोठी घट झाली. परिणामी व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या हातातील भांडवल संपुष्टात आले. परिणामी मार्च व एप्रिलपासून कमी प्रमाणावर बॅच टाकल्या जात असल्याने सध्या प्लेसमेंट निम्म्यावर आहे. त्यामुळे उत्पादन मर्यादित असल्याने दर स्थिर आहेत. 

अलीकडे लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर चिकन विक्री सुरू झाल्यानंतर मागणी वाढत गेली. मात्र पक्षी मर्यादित असल्याने मागणी पुरवठ्याचे गणित संतुलित आहे. त्यामुळेच ब्रॉयलर जिवंत कोंबड्यांच्या दराने मे महिन्यात १२५ रुपये उच्चांक गाठला होता. आषाढ महिन्याच्या अखेरपर्यंत जिवंत ब्रॉयलर पक्षांचे दर प्रतिकिलो ९५ रुपयांपर्यंत होते. त्यानंतर चालू श्रावण महिन्यातील १० ते १५ रुपये झालेली घसरण मागील ५ वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

मर्यादित उत्पादन व उत्पादन खर्च कमी असल्याने गणित बसायला आता सुरुवात झाली आहे. मात्र मका, सोयाबीन दर दबावात असल्याने उत्पादन खर्च कमी झाले असले तरी आता डिझेल दरवाढीमुळे पुन्हा १० टक्के वाहतूक खर्चात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच वैयक्तिक व करार पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या अनेकांकडे भांडवल नसल्याने शेड मोठ्या प्रमाणावर खाली आहेत.

पोल्ट्री उद्योगाची सध्याची स्थिती

  • भांडवलाअभावी उत्पादनात घट 
  • क्रेडिटवर मिळणाऱ्या मालाची उपलब्धता कमी
  • मनुष्यबळ मर्यादित असल्याने व्यवस्थापनात अडचणी
  • मागील नुकसान पाहता पुढे जोखीम नको म्हणून मर्यादित उत्पादन

राज्यातील प्लेसमेंटची स्थिती
४.५ कोटी    

सरासरी प्लेसमेंट
२.५ कोटी    
सध्याची प्लेसमेंट

प्रतिक्रिया
हॉटेल व्यवसाय बंद असताना थेट ग्राहकांनी पसंती दिल्याने श्रावण महिन्यात सकारात्मक चित्र आहे. उत्पादन व पुरवठा या दोन्ही बाजूने स्थिर वातावरण आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत श्रावणात दर पडतो त्या प्रमाणात सध्या अडचण नसल्याचे चित्र आहे. 
-डॉ. प्रसन्न पेडगावकर, महाव्यवस्थापक, व्यंकटेश्वरा हॅचरिज

कोरोनाची भीती ग्राहकांमध्ये कमी होऊन पुन्हा चिकनची मागणी वाढती आहे. उत्पादन मर्यादित असल्याने पुरवठा सुरळीत आहे. पुढे भविष्यात चित्र स्पष्ट नसल्याने आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून सध्या उत्पादन मर्यादित ठेवले आहे. मात्र मागणी वाढती व उत्पादन खर्च नियंत्रणात असल्याने जमेची बाजू आहे.
-उद्धव आहिरे, व्यवस्थापकीय संचालक, आनंद ॲग्रो ग्रुप


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...