agriculture news in Marathi, poultry industry want Govt intervention, Maharashtra | Agrowon

शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडील धान्य पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुदानावर देण्याची मागणी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी अन्नपुरवठा खात्याकडे हे निवेदन पाठविले आहे. राज्यात लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्याआधी आमच्या मागण्यांवर निर्णय झाला तरच पोल्ट्री उद्योग सावरू शकेल.
- श्याम भगत, अध्यक्ष, नॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटी, महाराष्ट्र

नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी मिळणारे दर यामुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी करीत या उद्योगाला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची या संदर्भाने भेट घेण्यात आली. त्या वेळी अनुदानावर पशुखाद्याचा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांकडून व्यक्‍त केली गेली. 

नॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटी महाराष्ट्राचे अध्यक्ष श्याम भगत यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकर यांची भेट घेतली. या वेळी व्यवसाय करताना उद्भवणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या. त्यामध्ये नजीकच्या काळात पशुखाद्याच्या दरातील वाढीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला. श्रावण महिना त्यानंतर गणपती व इतर सण, उत्सव आल्याने अंड्यांची मागणी घटली आहे. ज्या प्रमाणात अंडी विकल्या जात आहेत. ती सरासरीच्या पाच टक्‍क्‍यांनी कमी आहेत. अंड्यांचा उत्पादकता खर्च ४ रुपयांपेक्षा अधिक तर दर तीन रुपये २० ते २५ पैसे इतके आहेत. त्यामुळे व्यवसायात ताळेबंद जुळत नसल्याचे सांगण्यात आले. शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्याकरिता पॅकेज जाहीर करावे किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे असलेल्या धान्याचा अनुदानावर पुरवठा केला जावा, अशी मागणी करण्यात आली. 

पुणे, सोलापूर, नाशिक, अलिबाग, रायगड हे पोल्ट्री व्यवसायाचे हब आहेत. परंतु त्याच ठिकाणी मोठ्या अडचणींचा सामना पोल्ट्री व्यावसायिकांना करावा लागत आहे. दरम्यान पशुसंवर्धनमंत्र्यांनी अनुदानावरील धान्य पुरवठ्यासंदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे निवेदन पुरवठा विभागाकडे पाठविले आहे. त्यावर लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
गहू, हरभरा पिकांसाठी एकात्मिक...या वर्षी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...