पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापन

पावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे कोंबड्यांमध्ये श्वसन रोग होण्याची शक्यता असते. तसेच डास, माश्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देखील कोंबड्यांमध्ये विविध आजारांचा प्रसार होतो.
poultry Management in rainy season
poultry Management in rainy season

पावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे कोंबड्यांमध्ये श्वसन रोग होण्याची शक्यता असते. तसेच डास, माश्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देखील कोंबड्यांमध्ये विविध आजारांचा प्रसार होतो. सध्याच्या पावसाळी वातावरणात जिवाणू आणि विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे कोबड्यांच्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशा वेळेस कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागतात. पावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे कोंबड्यांमध्ये श्वसन रोग होण्याची शक्यता असते. तसेच डास, माश्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देखील कोंबड्यांमध्ये विविध आजारांचा प्रसार होतो. व्यवस्थापन 

  • पावसाळ्यामध्ये पोल्ट्री शेडच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करून घ्यावी.शेडच्या बाजूंनी वाढलेले गवत काढून घ्यावे.
  • पोल्ट्री शेडच्या आजूबाजूला पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूने चर खोदावेत. जेणेकरून तिथे पाणी साचून राहणार नाही.
  • शेडचे छप्पर भिंतीपासून पुढे आलेले असावे. जेणेकरून पाऊस शेडच्या आतमध्ये येणार नाही. पोल्ट्री शेडची पत्रे गच्च बांधून घ्यावेत. त्यामुळे जोरदार पावसात किंवा वादळात उडून जाणार नाहीत.
  • नवीन पिल्ले शेडमध्ये ठेवण्याच्या अगोदर चुना मारून घ्यावा.
  • शेड मध्ये माश्यांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • पावसाळ्यामध्ये शक्‍यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. कोंबड्यांना त्रास होत नाही.
  • शेडचे छप्पर गळके नसावे. नाहीतर लिटर ओले होण्याची शक्यता असते.
  • शेडमधील लिटर दिवसातून दोनदा चांगल्या प्रकारे हलवून घ्यावे. जेणेकरून त्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव वाढणार नाही. लिटर ओले राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लिटर ओले राहिल्यास त्यामधून विविध आजार होण्याची शक्यता असते. ओलाव्यामुळे कोंबड्यांमध्ये कॉक्‍सीडीऑसीस आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. लिटर जास्त ओले झाल्यास बदलावे.
  • कोंबड्यांचे खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. प्रत्येक वेळेस खाद्याची तपासणी करावी,त्यानंतर खाद्य खाण्यास द्यावे. ओलाव्यामुळे खाद्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.
  • खाद्य आणि पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावी. पिण्यास स्वच्छ पाणी द्यावे. तसेच पाण्यामध्ये जंतुनाशकाचा वापर करावा. पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होण्याची जास्त शक्यता असते. त्यातून विविध आजार होण्याची देखील शक्यता अधिक असते.
  • शेडच्या बाहेर फूटबाथ चा वापर करावा. रोगप्रसार टाळण्यासाठी बाहेरील व्यक्ती तसेच वाहन यांचा शेडच्या आवारात प्रतिबंध करावा.
  • मेलेल्या कोंबड्यांना उघड्यावर फेकू नये. त्यांना खड्यामध्ये पुरावे. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका टळतो. वेळोवेळी पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • परसबागेतील कुक्कुटपालन

  • वजनवाढ, वर्षाला मिळणारे अंडी उत्पादन व विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ या बाबी लक्षात घेऊन परसबागेसाठी कोंबड्यांची जात निवडावी.
  • परसबागेतील कुक्कुटपालनासाठी मुख्यतः वनराजा, गिरिराजा, सातपुडा इत्यादी जातींची निवड करावी.
  • परसबागेत कोंबड्यांचे संगोपन करताना बरेच शेतकरी या कोंबड्यांना कोणतेही लसीकरण करून घेत नाहीत. यामुळे गावात एखाद्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कोंबड्यांना झाली की गावातील गावरान कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मरतूक होते. म्हणून या कोंबड्यांना किमान राणीखेत, गंबोरो, पॉक्‍स (देवी), आय.बी. इत्यादी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून कोंबड्यांची मरतूक कमी होऊन नुकसान होणार नाही.
  • घार, कुत्रे, मांजर इत्यादी प्राणी-पक्षांपासून संरक्षणासाठी जाळीच्या कंपाउंडमध्ये व वरून शेडनेट लावून कोंबड्यांचे संगोपन करावे.
  • कोंबड्यांना ज्या ठिकाणी सतत ओलावा, दलदल असते अशा ठिकाणी सोडू नये. त्यामुळे ओलसरपणा व दलदलीमुळे कॉक्‍सिडीओसीस आजाराचा धोका वाढतो.
  • जंत प्रादुर्भावामुळे कोंबड्यांची मरतूक होऊ शकते. सतत उकिरडे, शेत, गोठे या ठिकाणी फिरण्यामुळे कोंबड्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी कोंबड्यांना जंताचे औषध द्यावे.
  • बाहेर फिरणाऱ्या कोंबड्यांना त्यांच्या शारीरिक गरजेप्रमाणे क्षार व जीवनसत्वांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे कमतरतेचे आजार दिसून येतात. या बाबी टाळण्यासाठी महिन्यातून किमान एक ते दोन वेळा जीवनसत्त्व, क्षारयुक्त द्रावणाचा कोंबड्यांच्या आहारात वापर करावा.
  • संपर्क- डॉ. श्रद्धा राऊत, ९२७०७०६००३ डॉ. प्रफुल्लकुमार पाटील (८३२९७३५३१४ ) (पशुपोषण आहारशास्त्र विभाग,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com