Agriculture news in Marathi Poultry owners should be compensated for the loss | Agrowon

नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कुक्कुटपालकांना भरपाई द्यावी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

नाशिक : चिकन खाल्ल्याने कोरोना होत असल्याच्या सोशल मीडियावरच्या अफवेमुळे कुक्कुटपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सचिव सचिन होळकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. 

नाशिक : चिकन खाल्ल्याने कोरोना होत असल्याच्या सोशल मीडियावरच्या अफवेमुळे कुक्कुटपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सचिव सचिन होळकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. 

सध्या परिस्थितीमध्ये प्रतिकिलो साठी ७५ ते ८० रुपये उत्पादनखर्च येत आहे. मात्र दहा रुपये किलोने विक्री करणेदेखील कठीण झाले आहे. अनेकांना ग्राहक न मिळाल्याने जिवंत कोंबड्या पुरून अथवा मारून टाकाव्या लागत आहे. अशी भयानक अवस्था निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या आधाराची गरज आहे. अन्यथा कुक्कुटपालन व्यवसाय कायमचा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याविषयी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी सचिन होळकर यांच्यासह इतर पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. अगोदर प्रत्येक जिल्ह्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घेणे अत्यंत गरजेचे आहे या संदर्भात सूचना त्यांनी दिल्या.

सरकारकडून जर कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. निवेदन देताना जितेश साबळे, विष्णू पंडित, जितेंद्र ताजणे, सोमनाथ सातपुते, राजू भोर, सुनील कोटकर, किशोर शिरसाठ, राजेंद्र घुगे, भाऊसाहेब साबळे आदी कुक्कुटपालक शेतकरी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या 

  • सरकारने गांभीर्याने विचार करावा 
  • तत्काळ कुक्कुटपालन नुकसानीचे पंचनामे करावे
  • कुक्कुटपालनासाठी घेतलेले कर्ज, व्याज माफ करावे
  • रोख स्वरूपात शेतकऱ्यांना मदत द्यावी

इतर ताज्या घडामोडी
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...
पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेशअकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग...
दिग्रसमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला...यवतमाळ  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
सांगलीतील द्राक्ष उत्पादकांचा ओढा...सांगली  : द्राक्षांची वाहतूक सुरु झाली असली...
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर घाऊक सौदे...कोल्हापूर  : येथील बाजार समितीत होणारे सौदे...
आपत्तीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘...पुणे  : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत...