नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान सभा करणार निषेध 

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध्ये चार हजार रुपयांवर आले आहेत.
‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान सभा करणार निषेध  Pouring soybeans in ‘tehsil’ Kisan Sabha will protest
‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान सभा करणार निषेध  Pouring soybeans in ‘tehsil’ Kisan Sabha will protest

नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध्ये चार हजार रुपयांवर आले आहेत. केंद्र सरकारने जनुकीय सुधारित (जीएम) सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्याने ही परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे किसान सभा सोमवारी (ता. २७) तहसील कार्यालयात सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा निषेध करणार आहे.   किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात सोयाबीनच्या पडत्या दरावर चर्चा करून चिंता व्यक्त करण्यात आली. यंदाचे सोयाबीन बाजारात येऊ लागले आहे. सोयाबीन बाजारात येताच दर अकरा हजारांवरून थेट चार हजारांवर आला आहे. केवळ वीस ते पंचवीस दिवसांत हे घडले. मुळात केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे.  २७ सप्टेंबर रोजी सोमवारी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे, त्यास ही कृती पूरकच आहे. शेतकऱ्यांनी कोसळलेल्या दराला घाबरून विक्री करू नये. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com