Agriculture News in Marathi Pouring soybeans in ‘tehsil’ Kisan Sabha will protest | Page 2 ||| Agrowon

नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान सभा करणार निषेध 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध्ये चार हजार रुपयांवर आले आहेत. 

नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध्ये चार हजार रुपयांवर आले आहेत. केंद्र सरकारने जनुकीय सुधारित (जीएम) सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्याने ही परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे किसान सभा सोमवारी (ता. २७) तहसील कार्यालयात सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा निषेध करणार आहे. 

किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात सोयाबीनच्या पडत्या दरावर चर्चा करून चिंता व्यक्त करण्यात आली. यंदाचे सोयाबीन बाजारात येऊ लागले आहे.

सोयाबीन बाजारात येताच दर अकरा हजारांवरून थेट चार हजारांवर आला आहे. केवळ वीस ते पंचवीस दिवसांत हे घडले. मुळात केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे. 

२७ सप्टेंबर रोजी सोमवारी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे, त्यास ही कृती पूरकच आहे. शेतकऱ्यांनी कोसळलेल्या दराला घाबरून विक्री करू नये.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा, असे आवाहन किसान सभेने केले आहे.


इतर बातम्या
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...