जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
कृषी प्रक्रिया
विड्याच्या पानापासून पावडर, पापड, खाकरा
पानवेलीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पानापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून शेतीला पानप्रक्रियायुक्त पदार्थांची जोड द्यावी, त्यामुळे चांगला फायदा मिळवता येतो.
पानवेलीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पानापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून शेतीला पानप्रक्रियायुक्त पदार्थांची जोड द्यावी, त्यामुळे चांगला फायदा मिळवता येतो.
- गडद हिरव्या रंगाच्या विड्याच्या पानाचा (पाईपर बीटल) वापर सार्वजनिक, सांस्कृतिक, लग्न समारंभ, धार्मिक उत्सव इत्यादी कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. पानाच्या जवळपास २००० विविध प्रजाती भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. पान टाकून तयार केलेली सुपारी अजूनही उत्कृष्ट मुखवास (माउथ फ्रेशनर) म्हणून ओळखली जाते.
- पानामध्ये प्रथिने, स्निग्धपदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल इत्यादी घटक मुबलक प्रमाणामध्ये आढळतात.
- बद्धकोष्ठता, श्वासाची दुर्गंधी, डोकेदुखी, खाज, हिरड्यांची सूज, संधिवात इत्यादी रोग बरे करण्यास पानातील पोषणद्रव्ये मदत करतात.
- मगधी, वेनमोनी, मैसूर, सालेम, कोलकता, बनारसी, कौरी, घानागेते आणि बागेर्हती या पानांच्या विविध जाती असून, त्यांचे वर्गीकरण हे रंग, आकार, चव आणि गंध यावरून केले जाते.
- पानाचा रंग पिवळसर हिरवा ते गडद हिरवा, चमकदार पृष्ठभाग आणि गंध वैशिष्ट्यपूर्ण आणि आनंददायी असून, त्याची सुगंधित गोड-तिखट चव ही पानामध्ये आढळणाऱ्या अत्यावश्यक तेलाच्या घटकामुळे असते.
- पानांचा रस विशिष्ट प्रमाणात घेतल्यास खोकला आणि अपचन यांसारख्या अडचणी दूर होतात.
- पानाचे देठ अपचन, बद्धकोष्ठता, खोकला इ. समस्यांवर उपयुक्त आहे. मौखिक आरोग्य राखण्यासाठी पानाचा उपयोग होतो.
- विड्याचे पान मधासोबत खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते.
पानापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ
पावडर
ताजी, हिरवी पाने निवडून स्वच्छ पाण्याने धुवावीत. पाने बारीक चिरून ती हॉट एअर ओव्हनमध्ये ६० अंश सेल्सिअसवर ३ तास वाळवावीत. वाळवलेल्या पानांची ग्राइंडरच्या साह्याने पावडर बनून घ्यावी. बनवलेली पावडर विविध अन्नपदार्थांमध्ये वापरता येते.
पापड
पानाचा स्वाद असलेले पापड अतिशय चविष्ट लागतात.
५५ ग्रॅम मुगाचे पीठ, ४० ग्रॅम उडदाचे पीठ, १ ग्रॅम मिऱ्याची पावडर, १ ग्रॅम पापडखार, ३-४ थेंब व्हिनेगर, स्वादानुसार मीठ आणि ५ ग्रॅम पानाची पावडर मिसळून पीठ मळावे. लहान आकाराचे पापड बनवावेत.
खाकरा
जिरे १ ग्रॅम, हळद पावडर ०.५ ग्रॅम, मिरची पावडर २ ग्रॅम, मीठ २ ग्रॅम, खाद्यतेल १० ग्रॅम आणि ५ ग्रॅम पानाची पावडर ९५ ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये मिसळून पोळी बनवावी. पोळी मंद आचेवर कडक भाजावी.
संपर्कः प्रा. रवींद्र काळे, ९४०३२६१४५०
(एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)
- 1 of 15
- ››