agriculture news in marathi powder, papad and khakhara made from bettle wine | Agrowon

विड्याच्या पानापासून पावडर, पापड, खाकरा

प्रा. रवींद्र काळे, प्रा. विठ्ठल चव्हाण
शनिवार, 4 जानेवारी 2020

पानवेलीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पानापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून शेतीला पानप्रक्रियायुक्त पदार्थांची जोड द्यावी, त्यामुळे चांगला फायदा मिळवता येतो.

पानवेलीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पानापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून शेतीला पानप्रक्रियायुक्त पदार्थांची जोड द्यावी, त्यामुळे चांगला फायदा मिळवता येतो.

 • गडद हिरव्या रंगाच्या विड्याच्या पानाचा (पाईपर बीटल) वापर सार्वजनिक, सांस्कृतिक, लग्न समारंभ, धार्मिक उत्सव इत्यादी कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. पानाच्या जवळपास २००० विविध प्रजाती भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. पान टाकून तयार केलेली सुपारी अजूनही उत्कृष्ट मुखवास (माउथ फ्रेशनर) म्हणून ओळखली जाते.
   
 • पानामध्ये प्रथिने, स्निग्धपदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल इत्यादी घटक मुबलक प्रमाणामध्ये आढळतात.
   
 • बद्धकोष्ठता, श्वासाची दुर्गंधी, डोकेदुखी, खाज, हिरड्यांची सूज, संधिवात इत्यादी रोग बरे करण्यास पानातील पोषणद्रव्ये मदत करतात.
   
 • मगधी, वेनमोनी, मैसूर, सालेम, कोलकता, बनारसी, कौरी, घानागेते आणि बागेर्हती या पानांच्या विविध जाती असून, त्यांचे वर्गीकरण हे रंग, आकार, चव आणि गंध यावरून केले जाते.
   
 • पानाचा रंग पिवळसर हिरवा ते गडद हिरवा, चमकदार पृष्ठभाग आणि गंध वैशिष्ट्यपूर्ण आणि आनंददायी असून, त्याची सुगंधित गोड-तिखट चव ही पानामध्ये आढळणाऱ्या अत्यावश्यक तेलाच्या घटकामुळे असते.
   
 • पानांचा रस विशिष्ट प्रमाणात घेतल्यास खोकला आणि अपचन यांसारख्या अडचणी दूर होतात.
   
 • पानाचे देठ अपचन, बद्धकोष्ठता, खोकला इ. समस्यांवर उपयुक्त आहे. मौखिक आरोग्य राखण्यासाठी पानाचा उपयोग होतो.
   
 • विड्याचे पान मधासोबत खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते.

पानापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

पावडर
ताजी, हिरवी पाने निवडून स्वच्छ पाण्याने धुवावीत. पाने बारीक चिरून ती हॉट एअर ओव्हनमध्ये ६० अंश सेल्सिअसवर ३ तास वाळवावीत. वाळवलेल्या पानांची ग्राइंडरच्या साह्याने पावडर बनून घ्यावी. बनवलेली पावडर विविध अन्नपदार्थांमध्ये वापरता येते.

पापड
पानाचा स्वाद असलेले पापड अतिशय चविष्ट लागतात.
५५ ग्रॅम मुगाचे पीठ, ४० ग्रॅम उडदाचे पीठ, १ ग्रॅम मिऱ्याची पावडर, १ ग्रॅम पापडखार, ३-४ थेंब व्हिनेगर, स्वादानुसार मीठ आणि ५ ग्रॅम पानाची पावडर मिसळून पीठ मळावे. लहान आकाराचे पापड बनवावेत.

खाकरा
जिरे १ ग्रॅम, हळद पावडर ०.५ ग्रॅम, मिरची पावडर २ ग्रॅम, मीठ २ ग्रॅम, खाद्यतेल १० ग्रॅम आणि ५ ग्रॅम पानाची पावडर ९५ ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये मिसळून पोळी बनवावी. पोळी मंद आचेवर कडक भाजावी.

संपर्कः प्रा. रवींद्र काळे, ९४०३२६१४५०
(एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)


इतर कृषी प्रक्रिया
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...
कृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...
चिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...
पपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...
भोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक...
चिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...
कलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...
जांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...