agriculture news in marathi, Power crisis due to faulty distribution: Sharma | Agrowon

सदोष वितरणामुळेच विजेचे संकट : शर्मा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राकडे मुबलक कोळसा आहे. मात्र, तो निकृष्ट दर्जाचा असल्याने क्रशरमध्ये बारीक पावडर होत नाही. त्यामुळे तो कोलयार्डातच बारीक करून पुन्हा क्रशिंगसाठी पाठवला जातो. त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होतो. उत्पादन खर्च वाढतो.  नाशिकच्या एका संचाचा कोळसा खासगी कंपनीला ८ महिन्यांच्या कालावधीसाठी वळविण्यात आला. तो करार ३० सप्टेंबरला संपला आहे. आता तो कोळसा पुन्हा नाशिकला आला पाहिजे. यासाठी आग्रह धरला जाईल.
- मोहन शर्मा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन

नाशिक : राज्यातच नव्हे तर देशभरात कोळशाचा साठा मुबलक आहे. मात्र, कोल इंडियाच्या वितरण प्रणालीत दोष असल्याने कोळशाची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या वीज केंद्रांना वेळेत व पुरेसा कोळसा मिळत नाही. महानिर्मितीचे वीज केंद्र सक्षम असूनही केवळ कोळशाअभावी वीजनिर्मितीत वारंवार अडचणी निर्माण होऊन नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष व जागतिक कामगार संघटनेचे सचिव मोहन शर्मा यांनी दिली.  

नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात शर्मा आले होते. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या सरकारचे धोरण सरकारीपेक्षा खासगी उद्योगांचे भले करण्याचे आहे. सरकारी वीज केंद्रांना कमी व खासगी वीज उद्योगाला जास्त प्रमाणात कोळसा पुरविला जातो. त्यामुळे विजेचे दर वाढतील व सर्वसामान्यांना ते परवडणार नाहीत. २ आॅक्टोबर २०१८ रोजी वीज वापराच्या स्पॉट मार्केटमध्ये नोंदवलेल्या पॉवर टेरिफनुसार एका युनिटचा विजेचा दर १८ रुपये झाला आहे. या दिवशी विजेच्या ट्रेडिंगमध्ये या किमतीनुसार २७४ मिलियन युनिट्स विजेची विक्री करण्यात आली. या टेरिफ रेटने मागील १० वर्षांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत, असे इंडियन एनर्जी एक्स्चेंजतर्फे जाहीर झाले आहे, असे शर्मा म्हणाले. या वेळी केंद्रीय पदाधिकारी विश्राम धनवटे, विनायक क्षीरसागर, हरिभाऊ सोनवणे, ज्योती नटराजन, प्रताप भालके आदी उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणावर भारनियमन

सद्यःस्थितीत स्थापित क्षमतेच्या ७०० ते ८०० मेगावॉट विजेची कमतरता आहे. येत्या काही दिवसांत विजेची मागणी २३ हजार मेगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वीजनिर्मिती व वितरण यातील तूट भरून काढण्यासाठी उपाय न केल्यास भारनियमनाला सामोरे जावे लागेल, असेही शर्मा म्हणाले.

इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील...पुणे ः गेल्या दोन दिवसांपूर्वी अनेक भागांत...
...तर ३२ गावांची जनावरे सातारा...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यातील कुकुडवाड...
जनताच मुख्यमंत्री ठरविते ः देवेंद्र...मुंबई : मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेना,...
नगरमधील सीईओंवरील ‘अविश्‍वासा’च्या...नगर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी...
नगर जिल्ह्यातील छावण्या आठ दिवसानंतर...नगर ः दोन दिवसांपूर्वी काही भागांत बऱ्यापैकी पाऊस...
मराठवाड्यात सव्वीस तालुक्‍यांत...औरंगाबाद : दोन दिवस बहुतांश भागांत पावसाची कृपा...
लष्करी अळी नियंत्रणासाठी एकात्मिक...परभणी ः मक्यावरील लष्करी अळीचा प्रसार झपाट्याने...
शिवसेना निवडणुकीला महत्त्व देणारा पक्ष...नगर : ‘‘जनआशीर्वाद यात्रेत जनतेचे आशीर्वाद व...
वाढीव शुल्कानुसार सत्राची नोंदणी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
काथरगाव येथे पुलाला लागून बांधलेला...संग्रामपूर जि. बुलडाणा ः खारपाणपट्ट्यात मोडणाऱ्या...
वाशीम जिल्ह्यात पीकविम्याची मुदत वाढून...वाशीम ः जिल्ह्यातील शेतकरी गेले वर्षभर विविध...
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी दांपत्य...पिंपळगाव हरेश्‍वर, जि. जळगाव ः कामासाठी शेतात...
पानपिंपरीधारकांचे रखडलेले अनुदान...अमरावती ः पानपिंपरी व पानवेली बागायतदारांच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला सिंधुदुर्ग ः  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी (...
परभणी जिल्ह्यातील ९२ हजार नागरिकांना...परभणी ः यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस...
सातारा जिल्ह्यात मराठवाड्याच्या धर्तीवर...सातारा : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी...
पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना एक...मुंबई ः खरीप हंगामातील पीक विमा भरण्यापासून...
पारगाव मेमाणे येथील विमानतळ सर्व्हेक्षण...पारगाव मेमाणे, जि. पुणे ः ‘‘आमच्याशी चर्चा...
परभणी : गतवर्षीच्या खरिपातील विमा...परभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी(...
आपत्कालीन परिस्थितीत मिश्र पिके घ्याः...पुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती,...