agriculture news in marathi Of power lines in Akole Budruk The friction burned four acres of sugarcane | Agrowon

अकोले बुद्रूकमध्ये वीज तारांच्या घर्षणाने चार एकर ऊस जळाला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला.

सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना माढा तालुक्यातील अकोले बुद्रूक येथे घडली. यामध्ये तीन शेतकऱ्यांचे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अकोलेतील प्रभाकर शत्रुघ्न परबत, अरुण कुंडलिक कोथमिरे, उत्तम त्रिंबक ढवळे यांचा को ८६०३२ व को २६५ या जातीचा आडसाली लागवडीचा ऊस होता. कारखान्याकडे गळितास तोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या उसाच्या वरील बाजूने, पंधरा ते सोळा वर्षांपूर्वीपासून बसवलेले विजेचे खांब व तारा आहेत.

गेल्या काही वर्षांपासून या वीजवाहिनींच्या तारा काहीशा सैल झाल्या आहेत. मोठ्याने वारा सुटला किंवा दहा-बारा पक्षी तारेवर बसले, तर त्या तारा एकमेकांना घासून ठिणग्या पडत होत्या. त्याच घर्षणाने हा ऊस अखेरीस जळाला. 

प्रभाकर परबत यांचा एक एकर, अरुण कोथमिरे यांचा दीड एकर आणि उत्तम ढवळे यांचा दीड एकर असा एकूण चार एकर ऊस जळाला आहे. जळीत ऊस हा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना व माळी शुगर फॅक्टरी यांच्याकडे गळितासाठी नोंदणी केला आहे. भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात...परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी...
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाजळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची...
‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई...परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी)...
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत...पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता....
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत...परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी...देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे...
पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदानपुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी...
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार...पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर...