नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
अकोले बुद्रूकमध्ये वीज तारांच्या घर्षणाने चार एकर ऊस जळाला
सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला.
सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना माढा तालुक्यातील अकोले बुद्रूक येथे घडली. यामध्ये तीन शेतकऱ्यांचे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
अकोलेतील प्रभाकर शत्रुघ्न परबत, अरुण कुंडलिक कोथमिरे, उत्तम त्रिंबक ढवळे यांचा को ८६०३२ व को २६५ या जातीचा आडसाली लागवडीचा ऊस होता. कारखान्याकडे गळितास तोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या उसाच्या वरील बाजूने, पंधरा ते सोळा वर्षांपूर्वीपासून बसवलेले विजेचे खांब व तारा आहेत.
गेल्या काही वर्षांपासून या वीजवाहिनींच्या तारा काहीशा सैल झाल्या आहेत. मोठ्याने वारा सुटला किंवा दहा-बारा पक्षी तारेवर बसले, तर त्या तारा एकमेकांना घासून ठिणग्या पडत होत्या. त्याच घर्षणाने हा ऊस अखेरीस जळाला.
प्रभाकर परबत यांचा एक एकर, अरुण कोथमिरे यांचा दीड एकर आणि उत्तम ढवळे यांचा दीड एकर असा एकूण चार एकर ऊस जळाला आहे. जळीत ऊस हा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना व माळी शुगर फॅक्टरी यांच्याकडे गळितासाठी नोंदणी केला आहे. भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
- 1 of 1024
- ››