नाशिक जिल्ह्यात कृषिपंपांची वीज खंडित

नाशिक : जिल्ह्यात थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या खंडित करण्याचा धडाका महावितरणने लावला आहे. मात्र विजेअभावी शेतीला पाणी देता येत नसल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Power outage of agricultural pumps in Nashik district
Power outage of agricultural pumps in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या खंडित करण्याचा धडाका महावितरणने लावला आहे. मात्र विजेअभावी शेतीला पाणी देता येत नसल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पिके लवकर पाण्यावर येत आहेत. त्यात प्रामुख्याने कांदा पिके अंतिम टप्प्यात असताना पाण्याची तीव्र गरज आहे. मात्र वीज जोडण्या खंडित केल्याने वेळेवर पाण्याअभावी मिळत नसल्याने उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे पिके जगवायची कशी? आम्हाला बिले भरायची आहेत. मात्र उत्पादन हाती आलेच नाही, तर पैसा कुठून येणार, बिले कशी भरणार, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 

कांदा व भाजीपाला पिके जळू लागली आहेत. चांदवड, इगतपुरी, नाशिक दिंडोरी तालुक्यात कुठलीही पूर्वसूचना न देता जोडण्या खंडित केल्या आहेत. वसुलीची सक्ती सुरु आहे. 

पूर्वसूचना न देता वीज जोडणी खंडित केली आहे. काही शेतकऱ्यांची बिले प्रलंबित म्हणून सर्वांना त्रास देण्यात येत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजीपाल्याला भाव नाही. नुकसान होऊन वाचलेला थोडाफार भात व्यापारी कवडीमोल भावाने घेत आहेत. आणि आता हे नवीन महावितरणचं संकट. - वसंत भोसले, शेतकरी-धामणी, ता. इगतपुरी.

वेळेवर बिले भरून कुठलाही मेंटेनन्स केला जात नाही, विजतारा जमिनीस लोंबकळल्या आहेत. असा भोंगळ कारभार आहे. मात्र बिले भरूनही वीज जोडण्या खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.  - सोपान भामरे, शेतकरी-पिंगळवाडे, ता. सटाणा. 

वीज जोड तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेकांचे कांदे, गहू शेवटच्या पाण्याच्या अवस्थेत आहे. त्यांना पाण्याची गरज आहे. शासनाने अजून दोन महिने मुदत वाढवून द्यावी.  - सचिन होळकर, सरचिटणीस, नाशिक, जिल्हा काँग्रेस कमिटी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com